अकोला: प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापकांच्या मागण्या शासन आणि शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत. यापूर्वी २६ जून रोजी धरणे आंदोलन आणि ११ जुलै रोजी निवेदनातून शिक्षक संघटनेने मागण्यांचा पाठपुरावा केला होता. मात्र अद्यापही या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे शनिवारी शिक्षक संघटनेने ठिय्या आंदोलन केले. मागण्या त्वरित मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे, प्रवीण ठाकरे, राहुल लोणाग्रे, रामेश्वर डाबेराव, संतोष गावंडे, दीपक वाघमारे, अनंता थोराईत, धर्मराज लाहोळे, अनिल चव्हाण, विलास घोरे, शिवाजी चव्हाण, मनीष आगाशे, योगेश अहिर, मयूर काळींग, अजीमोद्दिन नुरोद्दिन, सैयद अहेमद अली, आसिफ खान, मो. खालीद, अब्दुल नदीम, एजाज अहेमद, प्रमोद गाढे, तारासिंग राठोड, दिनेश मांगुळकर, आशिष शर्मा, पंकज पांडे, राहुल कोरडे यांनी दिला आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या
By admin | Updated: July 20, 2014 02:02 IST