शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हे भूतकाळासाठी नाही, भविष्यकाळासाठी असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:17 IST

अकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते.  मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.

ठळक मुद्देनवरात्र व्याख्यानमाला पुष्प सहावे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते.  मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्यावतीने आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना प्रा. पानसे बोलत होते. सोमवारी प्रा. पानसे यांनी ‘परिवर्तनासाठी नवा शिक्षण विचार’ या विषयावर प्रबोधन केले. तत्पूर्वी प्रा. पानसे यांचा परिचय प्रा. नारायण कुळकर्णी-कवठेकर यांनी करू न दिला. पाहुण्यांचे स्वागत प्रा. सुरेश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनुराग मिश्र यांनी केले.सध्या आपल्याकडील शालेय शिक्षण अतिशय वाईट आहे. पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचे काही येत नाही, असे चित्र असल्यामुळे शिक्षणात परिवर्तनाची गरज आहे. शिक्षणाशी संबंधित असणार्‍या शिक्षक, पालक, शाळा संस्थापक असे सर्व घटकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. तसेच आजच्या शिक्षण पद्धतीत मूलभतू परिवर्तन करणे आवश्यक आहे. शिक्षण हे नेहमी शिकणार्‍यांच्या जीवनासाठी असते. केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता नसते. शिक्षण हे नेहमी प्रवाही असावे लागते. विसाव्या शतकातील शिक्षण एकाच पठडीतील आहे. एवढचं नव्हे, तर पुढली पिढीही तेच शिक्षण घेत आहे. विसाव्या शतकाचे स्वरू प असे होते, की तो काळ औद्योगिक काळ होता. औद्योगिक काळात जो एकवेळा एक काम करीत होते. आयुष्यभर तेच काम त्याला करावे लागत असे.  विसाव्या शतकातील शैली परिवर्तनवादी होती. मात्र, एकविसाव्या शतकात वर्तनवादी झाली.  जीवनशैली वेगाने बदलत असली, तरी  शिक्षण मात्र तेथेच अडकले, अशी खंत प्रा. पानसे यांनी व्यक्त केली.शिक्षक वर्गात मुलांना चांगले शिकवितात, पण ते केवळ विषय शिकवितात. मुलांना शिकवित नाही. शिक्षक शिकवितो. मुले समोर असतात. शिक्षक मुलांना विषय शिकविण्याची जबाबदारी घेतो; पण मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेत नाही. किती शिक्षक शिकविताना मुलांच्या मानसिक, सामाजिक क्षमतांचा विचार करतात. मुलांची आकलन क्षमतेचाही विचार करीत नाहीत. आकलनशास्त्र  सध्याच्या शिक्षण पद्धतीतील मोठ देणगी असल्याचे प्रा.पानसे म्हणाले.-