शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रद्दी पासून साकारले इकोफ्रेंडली अष्टविनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST

संजय उमक मूर्तिजापूर : येथील प्रतीक नगरमध्ये राहणाऱ्या कुणाल मांजरे याने लॉकडाऊनचा सदुपयोग करुन अभ्यासाबरोबर कला जोपासत त्याने कागद ...

संजय उमक

मूर्तिजापूर : येथील प्रतीक नगरमध्ये राहणाऱ्या कुणाल मांजरे याने लॉकडाऊनचा सदुपयोग करुन अभ्यासाबरोबर कला जोपासत त्याने कागद व रद्दी पासून सुंदर अष्टविनायक साकारले आहेत.

कुणाल हा डीएडचा विद्यार्थी असून, तो अमरावती येथे शिवाजी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिन्यांपासून महाविद्यालय बंद असल्याने ऑनलाईन अभ्यास सुरु आहे. सतत घरी व मोबाईलवर राहून कंटाळलेला कुणाल मधला कलावंत जागी झाला. त्याने गुगलवरुन अष्टविनायकाचे फोटो गोळा करीत, त्या फोटोवरून घरी असलेल्या रद्दी व वर्तमान पत्र पाण्यात भिजत ठेवून तयार झालेल्या लगद्यापासून उत्कृष्ट अशा आठ गणेशाच्या दीड ते दोन फुट आकाराच्या इकोफ्रेंडली मूर्तीं साकारल्या आहेत.

--------------

पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करणार !

कुणालने निसर्गाचे व पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न म्हणून केवळ कागदाच्या लगद्यापासून विविध कलाकृती बनविणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कागदाशिवाय इतर कुठल्याही वस्तूचा वापर न करता सुरुवातीला कुणालने तुळजाभवानीचा मुखवटा तयार करुन त्याला तुळजाभवानीचे मुहूर्त स्वरूप दिले. तेव्हापासून विशेष काही करण्याची आवड कुणालला निर्माण झाली.

----------------

मला कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही. जे सुचत गेले, ते मी करत गेलो. शाळा व अभ्यास करुन मी कला जोपासतो. भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही कला अधिक चांगल्या प्रकारे जोपासणार आहे.

-कुणाल केशव मांजरे, मूर्तिजापूर.