शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’ हटवणार

By admin | Updated: August 2, 2016 01:51 IST

आयुक्तांचा निर्णय : प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश

अकोला : कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ह्यडम्पिंग ग्राउंडह्णवरील जागा अपुरी पडत आहे. परिसरातील अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अवैधरीत्या ताबा घेतल्याने समस्येत अधिकच भर पडली. शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता नायगावातील ह्यडम्पिंग ग्राउंडह्ण हटवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला असून, सोमवारी पर्यायी जागेची पाहणीदेखील केली. तसेच कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर ह्यडम्पिंग ग्राउंडह्ण निर्माण करण्यात आले. याठिकाणी साचणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शिवाय स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे कचरा साठवणुकीच्या संदर्भात विविध अडचणी निर्माण होत आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, शहरातील कचरा घेऊन जाणार्‍या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, धमकावण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल गाठली आहे. परिणामी घंटागाडी चालकांनी शहराच्या विविध भागात कचरा टाकण्यास सुरुवात केली. यामुळे ऐन पावसाळ्य़ात साथ रोगांचा फैलाव होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.यासंदर्भात ह्यलोकमतह्णने सातत्याने वृत्त प्रकाशित करून कचर्‍याच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. कचर्‍याची समस्या ध्यानात घेता यावर प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला असून, त्यादिशेने वाटचाल सुरू केली आहे. नायगावातील ह्यडम्पिंग ग्राउंडह्ण हटवून पर्यायी जागेवर कचरा साठवणू केली जाईल. सोमवारी आयुक्त लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या (आरपीटीएस) मागील जमिनीची पाहणी केली.