शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनावर होणार परिणाम

By admin | Updated: April 8, 2015 01:42 IST

पोषक चारा निर्मितीवर भर देणे आवश्यक

प्रवीण खेते/अकोला: अकोला जिल्हा हा कोरडवाहू भागामध्ये मोडत असल्याने उन्हाळ्य़ात साहजिकच पाणीटंचाई सोबतच चारा टंचाईचा गंभीर प्रश्न पशुधन पालकांना सतावतो. उन्हाच्या वाढत्या पार्‍यामुळे आगामी काळात दूध उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तेव्हा जिल्ह्यातील दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुधन पालकांनी पोषक चारा उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भौगोलिक मापदंडाचा विचार केला, तर जिल्हा हा कोरडवाहू भागात मोडत असून, येथील शेती व चारा उत्पादन पावसाळ्य़ावर अवलंबून आहे. पावसाळ्य़ात चांगला पाऊस झाल्याने हिवाळ्य़ात जनावरांना आवश्यक तो पोषक आहार मिळतो. परिणामी हिवाळ्य़ामध्ये जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता वाढलेली असते; परंतु, उन्हाळा लागताच हळूहळू जिल्ह्यातील दूध उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होताना दिसतो. साधारणत: मार्चअखेरीस जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता कमी व्हायला सुरुवात होते; परंतु, यंदा गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जनावरांना काही प्रमाणात हिरवा चारा मिळाला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दूध उत्पादनावर जास्त परिणाम झाला नसला तरी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे आगामी काळात दूध उत्पादनावर परिणाम दिसून येणार आहे. आगामी काळात उन्हाचा पारा वाढणार असल्याने जनावरांसाठी पोषक चारा निर्मितीची चिंता पशुधन पालकांना सतावणार आहे. तेव्हा वेळीच नियोजन करून जनावरांसाठी पोषक चार्‍याच्या निर्मितीसाठी पशुपालकांनी दक्ष असणे गरजेचे आहे.