शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात जाण्याच्या भीतीने वृद्धाने घेतले जाळून

By admin | Updated: October 31, 2014 01:28 IST

अकोला येथील घटना, ८४ टक्के भाजल्याने वृद्धाचा मृत्यू.

अकोला: तुरुंगात जाण्याच्या भीतीने खडकी भागातील ६५ वर्षीय वृद्धाने जाळून घेतल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. घटनेमध्ये वृद्ध ८४ टक्के भाजल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास हाती घेतला आहे. मृत्यू पावलेल्या वृद्धाचे शिवलाल पांडुरंग सुकळीकर असे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी शिवलाल सुकळीकर यांची सून आरती हिने जाळून घेतले होते. यात आरतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या माहेरच्याकडील मंडळींनी पती संतोष सुकळीकर, सासरे शिवलाल, सासू, दीर बंडू सुकळीकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ व इतर कलमांसह गुन्हा केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणाचा गुरुवारी निकाल लागण्याची शक्यता असल्याने, शिवलाल सुकळीकर हे तणावात होते. निकाल कुटुंबाच्या विरोधात लागला तर आपल्याला तुरुंगात जावे लागेल, अशी भीती त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. या भीतीपोटीच त्यांनी अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला जाळून घेतले. यात ते ८४ टक्के भाजले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.