धनंजय कपाले, शीतल धांडे / वाशिम, रिसोडऔषध दुकानदारांना परवानाधारक फार्मासिस्टच्या देखरेखीतच औषधांची विक्री करण्याचे निर्देश असताना, या निर्देशाची बहुतेक ठिकाणी पायमल्ली होत आहे. वाशिम शहरात नाममात्र दराने भाड्याने परवाने घेऊन अप्रशिक्षित व्यक्तींकडून औषधांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब ह्यलोकमतह्णने केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमधून उघड झाली. विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण खासगी, सरकारी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. सरकारी रुग्णालयात औषधे मिळाली नाहीत तर औषधे खरेदी करण्यासाठी खासगी औषध दुकानांकडे रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना धाव घ्यावी लागते. औषधे खरेदी करण्यासाठी येणार्या रुग्णांना चुकीची औषधे जाऊ नये, वैद्यकीय अधिकार्यांच्या ह्यप्रीस्क्रिप्शनह्णनुसार औषधे देण्यात यावीत, यासाठी संबंधित औषध दुकानांमध्ये ह्यफार्मासिस्टह्ण असणे बंधनकारक आहे. औषध दुकानात दुकानदार हा स्वत: फार्मासिस्ट असावा किंवा फार्मासिस्ट असलेला कर्मचारी ठेवून औषधे विक्री करावी, असे बंधनकारक आहे. मात्र फार्मासिस्ट नसतानाही वाशिम शहरात औषधी दुकानातून औषधे देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण दरम्यान उघडकीस आली. शहरातील पाटणी चौकामधील एका औषध दुकानाला भेट दिली असता त्या ठिकाणी परवानाधारक नाही तर अन्य व्यक्ती औषध देताना आढळून आले. या मेडिकलसाठी एका तरूणीच्या नावाने फार्मासिस्टचा परवाना देण्यात आलेला आहे. परंतु सदर तरूणी या ठिकाणी आढळून आली नाही. जुन्या जिल्हा परिषदेसमोरील एका औषध दुकानामध्येदेखील एक अप्रशिक्षित युवक औषधांची विक्री करताना आढळून आला. या दुकानामध्ये फार्मासिस्टचा परवाना अन्य नावाने असताना, ज्यांच्या नावाने हा परवाना आहे, तो व्यक्ती मेडिकल स्टोअरमध्ये हजर नसल्याचे दिसून आले. आर.ए. कॉलेज मार्गावरील दुसर्या एका औषध दुकानाला भेट दिली असता, या ठिकाणी दुकानाचे मालक स्वत:च औषधांची विक्री करीत असल्याचे आढळून आले. या दुकानामध्ये फार्मासिस्ट नेमला आहे, मात्र तो दुकानात आढळून आला नाही. पाटणी चौकातील एका औषध दुकानाला भेट दिली असता त्याठिकाणी एकही फार्मासिस्ट आढळून आला नाही. त्याही ठिकाणी दुकानदाराने दोन फार्मासिस्ट नेमले असल्याचे सांगितले, मात्र ते दोघेही जेवण करण्यासाठी गेले असल्याची सबब त्यांनी दिली. पुसद नाका परिसरातील अन्य एका औषध दुकानाला भेट दिली असता, त्या ठिकाणी दुकानदाराकडे अधिकृत फार्मासिस्ट आढळला. काटा मार्गावरील अन्य एका औषध दुकानाला भेट दिली असता दुकानदारास फार्मासिस्टसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी स्वत: फार्मासिस्ट असल्याचे सांगितले. परंतु, परवाना नूतनीकरणासाठी दिल्याने सध्या परवाना दाखवू शकत नाही, असे उत्तर दिले. मागील काही वर्षांपासून औषध दुकानदारांना फार्मासिस्टबाबत प्रशासनाकडून सक्तीच्या सूचना दिल्या गेल्या. मात्र, औषध प्रशासनाने सुरुवातीच्या काळात उपसलेला कारवाईचा बडगा अचानक मावळल्याने मेडिकल दुकानदारांसोबत ह्यअर्थपूर्णह्ण संबंध तयार झाल्याचे यामधून स्पष्टपणे जाणवत आहे.
भाड्याच्या परवान्यांवर चालताहेत औषध दुकाने!
By admin | Updated: April 5, 2016 02:05 IST