शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ संपला; पण शेतकरी आत्महत्या थांबेनात!

By admin | Updated: August 25, 2016 02:04 IST

तीन महिन्यांत जिल्ह्यात २८ शेतक-यांच्या आत्महत्या.

संतोष येलकरअकोला, दि. २४: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत गत आठ महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांतील दुष्काळ संपला असला, तरी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नसल्याची बाब समोर येत आहे.गत काही वर्षात बदलत्या वातावरणात कधी अत्यल्प पाऊस, कधी अतवृष्टी तर कधी वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच गत दोन वर्षांच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला होता. सतत दोन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत; मात्र शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले नाही. सन २0१४ मध्ये जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४१ आणि २0१५ मध्ये ४७ शेतकरी आत्महत्या झाल्या. तर सन २0१६ या वर्षात जून ते २४ ऑगस्टपर्यंत या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी गत दोन वर्षातील दुष्काळानंतर, यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला; मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबल्या नसल्याची स्थिती आहे.