शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
2
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
3
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
4
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
5
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
6
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
7
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
8
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
9
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
10
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
11
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
12
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
13
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
14
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
15
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
16
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
17
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

आगर परिसरात रिमझिम पाऊस; शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST

आगर : परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गत दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण ...

आगर : परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गत दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याने रब्बी पिके धोक्यात सापडले आहे. हरभऱ्यावर अळींचे आक्रमण वाढल्याने यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

आगर परिसरात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी उगवा, आगर, पाळोदी, नवळथ आदी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या परिसरात तुरीचे पीक सोंगणीला आले असून, पावसामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी धास्तावला आहे. खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीच्या उत्पादनात घट होऊन लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. असे असतानाही शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पेरणी केली. सध्या हरभऱ्याचे पीक बहरले असून, फूलधारणा अवस्थेत आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण व सोमवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके संकटात सापडले आहे. (फोटो)

-----------------------------------

हरभऱ्याचे पीक फूलधारणा अवस्थेत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे फूलगळ होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

- शेतकरी आगर

----------------------------

हरभरा पिकाची फूलगळ

आगर परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. थंडीचा जोर वाढल्याने सध्या पीक बहरले असून, फूलधारणा अवस्थेत आहे. अशातच गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभऱ्याची फूलगळ होत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे.