शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बापलेकीचा बळी घेणाऱ्या चालकास सात वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:53 IST

Rigorous imprisonment कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा मार्गावर शिवनगर शिवारात ५ फेबुवारी २०१२ रोजी ही घटना घडली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्ककाजळेश्वर उपाध्ये :  मद्यप्राशन करून भरधाव कारने काजळेश्वरच्या बापलेकीचा बळी घेणाऱ्या चालकास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी २२ फेब्रुवारी सुनावली. कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा मार्गावर शिवनगर शिवारात ५ फेबुवारी २०१२ रोजी ही घटना घडली होती. काजळेश्वर उपाध्ये येथील रहिवासी तथा धोत्रा जि.प. शाळेचे मुख्याध्यापक हरिदास तुळशीराम उपाध्ये हे कुटुंबासह पोहामार्गे कारंजाकडे येत असताना ५ फेबुवारी २०१२ रोजी शिवनगर शिवारात त्यांचा मुलगा ऋषिकेश याला लघुशंका आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याचवेळी कारंजाकडून येणाऱ्या एम.एच.०४ एपी ७४६ क्रमांकाच्या कारचा चालक विनोद साहेबराव कोमरेकर याने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवित रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हरीदास उपाध्ये कुटुंबीयाला जोरदार धडक दिली. यामधे गाडीवर असलेली रुचा हिचा जागीच मृत्यू झाला तर हरिदास व त्यांच्या पत्नी सविता या गंभीर जखमी झाल्या होत्या. हरिदास उपाध्ये यांचा दवाखान्यात मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी कारचालक विनोद कोमरेकर याच्याविरुद्ध कारंजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर मंगरूळपीर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी विनोद कोमरेकर याने दोन वेळा उच्च न्यायालयात तर एक वेळ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळून लावली. अतिरिक्त व सत्र न्यायालयात साक्षी व पुरावे घेण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी विनोद कोमरेकर हा दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सिद्ध झाल्याने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास तसेच १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अधिक सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय