शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पावर फिरले पाणी!

By admin | Updated: December 16, 2015 02:04 IST

राज्यातील १0६ गावांमध्ये प्रकल्प; १00 कोटींच्या निधीपैकी केवळ १0 कोटी रुपये मिळाले.

राजरत्न सिरसाट/ अकोला: ग्रामीण भागातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करू न त्या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १0६ गावांमध्ये हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. तथापि, या कामासाठी मंजूर झालेल्या १00 कोटींच्या निधीपैकी १0 कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित निधी कपात करण्यात आल्याने या प्रकल्पांच्या कामावरही पाणी फिरले आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी राज्यातील काही शहरांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या पाण्याचा पुनर्वापरही करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना आखण्यात आली असून, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे शुद्ध केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यावर नाशिक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आधुनिक तंत्रज्ञान साहाय्य संशोधन विभागात संशोधन करण्यात आले आहे. या प्रकल्पाकरिता सूक्ष्म पातळीवर नियोजनही करण्यात आले असून, पोषक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. ह्यफायटोराइटह्ण जातीचे वृक्ष सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यास उपयोगी ठरत असल्याचे संशोधनही झाले आहे. राज्यातील १0६ गावांत हा प्रकल्प राबविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण कृषी विकास बँक (नाबार्ड) ने १00 कोटी रुपये दिले होते. या रकमेतील दहा कोटीच या प्रकल्पाच्या कामांना मिळाले आहेत. दरम्यान, सध्या पुणे विभाग चार, जळगाव जिल्ह्यात दोन आणि अमरावती विभागात दोन अशा आठ प्रकल्पांची कामे सुरू असल्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात आहे; मात्र या प्रकल्पांना निधी कमी पडल्यास ते देखील अर्धवट राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात ग्रामीण भागात आठ ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. निधीची पूर्तता झाल्यावर उर्वरित प्रकल्पांची कामे सुरू केली जातील. या प्रकल्पामुळे वाया जाणार्‍या सांडपाण्याचा यथोचित वापर होणार असल्याच् ोमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता डी.सी. लांडगे यांनी स्पष्ट केले.