शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलांना पैसे देवून शिक्षणापासून वंचित ठेवू नका! - विनोद राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:41 IST

शिक्षणापासून वंचित ठेवण्याला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करणाºया सेव्ह बचपन चळवळीचे राज्य पदाधिकारी विनोद राठोड यांनी व्यक्त केले.

अकोला : रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात अनेक मुले भिक मागतात. त्या मुलांना भिक देणे म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करणाºया सेव्ह बचपन चळवळीचे राज्य पदाधिकारी विनोद राठोड यांनी व्यक्त केले आहे. अकोला जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याकरिता सेव्ह बचपनच्यावतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता राठोड अकोल्यात आले होते.  

तुमच्या जिल्हा परिषद शाळेत काय बदल घडविले? - मी अमरावती जिल्ह्यातील सालनापूर येथील जिल्हा परिषद शाळेत लक्षवेधी परसबाग विकसित केली आहे. या बागेत २१० प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण पिक सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जाते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातील सहा दिवसांकरिता सहा वेगळे गणवेश देण्यात आले आहेत. यासोबतच दर्जेदार शिक्षण देण्यावर आमचा प्रमुख भर असतो. युनेस्कोने आमच्या शाळेची दखल घेतली आहे.  

 तुम्ही शाळाबाह्य मुलांना शिक्षण देण्याकरिता काय प्रयत्न केले? - आम्ही आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्याकरिता आदिवासी भाग, विविध समाजाचे तांडे, पाडे, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात जाऊन पालकांना भेटून त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला. 

 सेव्ह बचपन चळवळ वाढविण्याकरिता काय प्रयत्न करीत आहात?- सेव्ह बचपन ही प्रामाणिक आणि निरंतर काम करणारी चळवळ आहे. या चळवळीत राज्यभरात अनेक शिक्षकांचा सहभाग आहे. मात्र, शिक्षकांसोबत यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढावा, हा आमचा उद्देश आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. मात्र, त्यांना मुलांना शिक्षण मिळत नाही. काही दिवस शाळेत गेल्यानंतर मुले नियमित शाळेत जात नाहीत. त्यांना चांगले शिक्षण मिळण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची आपली जबाबदारी समजून कार्य करायला हवे.  

त्याकरिता सामान्य माणसाने काय करायला हवे?- सामान्य माणसाला कार्यालयात जाताना, बाजारात खरेदीसाठी जाताना भिक मागताना मुले दिसली किंवा कचरा - प्लॅस्टीक पन्नी वेचताना मुले दिसली तर त्यांच्याशी बोलून ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या शाळेत प्रवेश द्यायला हवा. या मुलांना शाळेत प्रवेश देण्याकरिता कोणतीही अडचण येत नाही. 

हे कार्य करताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? - अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ते राहत असलेल्या परिसरात किंवा गावात जावून त्यांना शाळा शिकण्याची विनंती केल्यावर त्यांच्या पालकांच्या रागाचा सामना करावा लागला. एकदा तर मुलांच्या पालकांनी मला चाकू दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दारू काढणाºया भागात जावूनही आम्ही मुलांच्या पालकांना समजावून शाळेत सहभागी करून घेतले आहे.  

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत