शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला शिवीगाळ ; माय-लेकास कारावास

By admin | Updated: June 18, 2017 02:08 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्‍यासह त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मायलेकास न्यायालयाने सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्‍यासह त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मायलेकास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने शनिवारी सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचेही आदेश दिले. डॉ. सूचिता सुभाष राठोड या कर्तव्यावर असताना त्यांनी शीतल संजय राऊत यांची २९ जून २0१२ रोजी रात्री साडेअकरा वाजता प्रसूती केली. यावेळी शीतल राऊत यांची आई शां ताबाई बागडे व त्यांचा मुलगा विक्की ऊर्फ अर्जुन रवींद्र बागडे हे रुग्णालयात उपस्थित होते. त्यानंतर शांताबाई बागडे यांनी क्षुल्लक कारणावरून डॉ. सुचिता राठोड यांच्याशी वाद घालत त्यांच्या कक्षात जबरदस्ती घुसल्या. त्यांना अश्लील शिवीगाळ केली. यावेळी बागडे यांचा मुलगा विक्की ऊर्फ अर्जुन बागडे याने दरवाजे आणि खिडक्यांवर दगड फेकल्याने काचा फोडून आर्थिक नुकसान केले. डॉ. सुचिता राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार शशिकांत गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. सहावे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्‍वेता चांडक यांनी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी बागडे मायलेकास तीन महिन्यांचा सश्रम कारावास, ५00 रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षा, तसेच जीवे मारण्याची धमकी देणे व जबरदस्तीने कार्यालयात घुसणे या कलमान्वये प्रत्येकी सहा महिन्यांचा सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांची साध्या कैदेचे आदेश दिले. दंडातील दोन हजार रुपये डॉ. राठोड व साक्षीदार शोभा श्यामराव जाधव यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे अँड. जी. एल. इंगोले यांनी काम पाहिले.