शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी शेतक-यांना हेलपाटे देऊ नका!

By admin | Updated: June 26, 2015 01:50 IST

पुनर्गठन, कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे पालक सचिवांचे निर्देश.

अकोला: पीक कर्जाचे पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना नवीन कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ३0 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे सांगत, पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना हेलपाटे सहन करावे लागणार नाहीत, याबाबत गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश शासनाच्या कामगार खात्याचे प्रधान सचिव तथा जिल्हय़ाचे पालक सचिव बलवंत सिंह यांनी गुरुवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गतवर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार बँकांनी कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून, शेतकर्‍यांना यावर्षी नवीन कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी शेतकर्‍यांना फेरफार आणि ह्यसर्च रिपोर्टह्ण सादर करण्याची गरज नसून, केवळ सात-बारा सादर करणार्‍या शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालक सचिवांनी दिल्या. कर्जाचे पुनर्गठन करून, शेतकर्‍यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, कर्जासाठी शेतकर्‍यांना हेलपाटे सहन करावे लागणार नाहीत, याबाबत दक्षता घेऊन शेतकर्‍यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बलदेव सिंह यांनी दिले. कर्जाचे पुनर्गठन आणि कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ३0 जूनपर्यंत बँकांनी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हय़ात झालेला पाऊस, बियाणे-खतांचा पुरवठा, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध निधी आणि झालेला खर्च, शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण,जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हय़ातील कामे, पीक कर्जाचे पुनर्गठन व कर्ज वाटप, विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची रिक्त पदे यासंदर्भात पालक सचिवांनी आढावा घेतला. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मालपुरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हय़ातील सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.