शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन दुचाकीस्वारांवर जिल्हाधिका-यांनी केली कारवाई!

By admin | Updated: November 20, 2015 02:36 IST

जे जिल्हाधिका-यांना दिसले ते वाहतूक शाखेला का दिसत नाही?

अकोला - शहरात प्रचंड धुडगूस घालणार्‍या अल्पवयीन दुचाकीस्वारांवर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी कारवाई केली. दुचाकीवर असलेल्या अल्पवयीन मुलींना रोखून त्यांनी कारवाई केली. मात्र, जे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिसले ते जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना रोज का दिसत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अल्पवयीन दुचाकीस्वार शहर वाहतूक शाखेसाठी १00 ते २00 रुपये देणारी ह्यकोंबडीह्ण असल्याचा गंभीर आरोपही काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या कारवाईनंतर केला. शहरासह जिल्हय़ात अल्पवयीन दुचाकीस्वारांनी प्रचंड धुडगूस घातला आहे. त्यांच्या बेताल दुचाकी चालविण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत नाही. आठवी ते दहावीचे विद्यार्थी सर्रास दुचाकी घेऊन शहरात वावरत आहेत. जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय असलेल्या रोडवरूनच भरधाव जाणार्‍या अल्पवयीन दुचाकीस्वारांची संख्या प्रचंड आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कारवाईनंतर उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी सकाळीच दुचाकीवर जाणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना रोखून त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्मेट व दुचाकीचे कागदपत्रं मागितले. मात्र, दोन्ही मुलींकडे यामधील एकही दस्तऐवज नसल्याने त्यांनी मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना या गैरप्रकारासंदर्भात विचारणा केली. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसभर शासनाच्या वाहनामध्ये बसून फिरतात. मात्र, अल्पवयीन दुचाकीस्वार, रॉकेलमि२िँं१्रूँं१त पेट्रोल टाकणारे ऑटो व ट्रीपलसीट दुचाकीवर कारवाई करीत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येते.

*जिल्हाधिका-यांनी घेतली फिरकी!

          जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अग्रवाल व लोहिया नामक अल्पवयीन मुलीवर दुचाकी चालविल्यामुळे कारवाई केली. त्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क साधून मुलीचा अपघात झाल्याचे सांगितले. काही वेळ पालकांची फिरकी घेतल्यानंतर मुलगी सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या पालकांना सांगितले. मात्र, मुलगी अल्पवयीन असताना तिच्याकडे दुचाकी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित करून यापुढे दुचाकी न देण्याचे निर्देश दिले.