शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित गावांसाठी जिल्हाधिकार्‍यांनी केली ८८ लाखांच्या कामांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:22 IST

पुनर्वसित गावांमध्ये सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विभागीय आयुक्तांनी पुनर्वसित गावांमध्ये सोयी-सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या गावात मूलभूत सुविधांसह विकास कामांसाठी ८८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

ठळक मुद्देअकोट व तेल्हारा तालुक्यातील गावांचा समावेश सुविधा पुरविण्याची प्रशासनाची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : पुनर्वसित गावांमध्ये सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विभागीय आयुक्तांनी पुनर्वसित गावांमध्ये सोयी-सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या गावात मूलभूत सुविधांसह विकास कामांसाठी ८८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या गावाचे पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आले; परंतु या गावात आदिवासी बांधवांना सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. जंगल वस्ती सोडल्यानंतर पुनर्वसित गावात सुविधा नसल्याने या गावात आरोग्य व अस्वस्थतेच्या कारणांमुळे चार वर्षांत २२८ जणांचा मृत्यू झाला. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महसूलचे अधिकारी यांनी या गावांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. या प्रकरणाची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेतली होती. विभागीय आयुक्तांनी या गावांना सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी, प्राथमिक शाळांच्या इमारती आदींसह विविध विकास कामांसाठी ८८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. 

अशी होणार विकास कामे गुल्लरघाट व सोमठाणा येथे नवीन प्राथमिक शाळेची इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १0 लाख रुपये, सोमठाणा, धारगड, गुल्लरघाट, अमोना कासोद येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी प्रत्येकी १२ लाख रुपये, सोमठाणा, धारगड, गुल्लरघाट व अमोला कासोद येथे स्मशानभूमीची विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख, अशी ८८ लाख रुपयांची विकास कामे होणार आहेत. 

पुनर्वसित गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आहेत. या गावांसाठी सुविधा पुरविण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले असून विकास कामांसाठी निधी वितरित करण्यासही मान्यता दिली आहे.- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, अकोला