शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘निमंत्रण पत्रिका’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास हक्कभंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 02:04 IST

गोवर्धन शर्मा यांचा इशारा: मनपात सभापती बाळ टाले यांचा पदग्रहण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: एलईडी पथदिव्यांच्या उद्घाटन कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिका प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर हक्कभंग दाखल करणार असल्याचा सज्जड इशारा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला. महापालिकेत स्थायी समिती सभागृहात सभापती बाळ टाले, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार यांच्या पदग्रहण सोहळ््यात ते बोलत होते. महापालिकेत १६ सदस्यीय स्थायी समितीच्या सभापतीपदी बाळ टाले यांची निवड झाली. स्थायी समितीपदी भाजप नगरसेवक बाळ टाले यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या वतीने पदग्रहण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ््याला खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी एलईडी पथदिव्यांसाठी शासनाकडून १० कोटींचा निधी मिळवला होता. त्यामध्ये प्रशासनाने १४ व्या वित्त आयोगातून १० कोटींचा हिस्सा जमा केला. एलईडी पथदिव्यांचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण पत्रिकेवर दोन्ही आमदारांचे छायाचित्र नसल्याचा मुद्दा उपस्थित होऊन भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरला. अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे भान ठेवणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींचा अपमान सहन केला जाणार नाही. निमंत्रण पत्रिका प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास हक्कभंग दाखल करणार असल्याचे आ. शर्मा यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी डॉ. किशोर मालोकार, दीपक मायी, डॉ. युवराज देशमुख, गटनेता राहुल देशमुख, हरीश आलिमचंदानी, अजय शर्मा, विजय इंगळे, विलास शेळके यांसह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष!शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू आहे. त्यांचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक ठिकाणी पैसा खाणे योग्य नाही. त्यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अशा कानपिचक्या खासदार संजय धोत्रे यांनी दिल्या. शहर विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन क रणार नसल्याचे खा. धोत्रे यांनी स्पष्ट केले.