शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मराठी राजभाषेचा वापर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: March 27, 2015 01:25 IST

पर्यावरण विभागाचा इशारा.

खामगाव (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शासन व्यवहारात मराठीचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत असून यापुढे मराठीचा वापर न केल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पर्यावरण विभागाने २५ मार्च रोजी दिला आहे.महाराष्ट्र राज्याची स्थापनेनंतर शासनाने मराठीतून राज्य कारभार करण्याचे धोरण जाहीर केले आहे. तसेच २६ जानेवारी १९६५ पासून मराठी ही राज्याची राजभाषा म्हणून घोषित केली आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मधील तरतूदीनुसार सर्व कामकाज मराठीतून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत शासनाकडून वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या. मात्र, असे असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कामकाज १00 टक्के मराठीतून होत नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे याबाबत पर्यावरण मंत्र्यांनीसुध्दा नाराजी व्यक्त केल्यानंतर पर्यावरण विभागाने २५ मार्च रोजी शासन परिपत्रक काढून मराठीचा राज्य कारभारात वापर करण्याबाबत सूचित केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने १८ मे १९८२, १८ जुलै १९८६, भाषा विभागाने १0 मे २0१२, २0 ऑगस्ट २0१४ च्या वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार प्रशासनातील जे अधिकारी व कर्मचारी राजभाषेचा वापर करण्याच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई, गोपनीय अभिलेखात नोंद घेणे, ठपका ठेवणे, एका वर्षाकरिता बढती रोखणे किंवा एक वर्षाकरिता पुढील वेतनवाढ रोखण्याबाबतच्याही सूचना दिल्या होत्या, तरी सुध्दा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे परिपत्रक काढून मराठीतून कामकाजाबाबत ताकीद देण्यात आली आहे.