शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

साहित्याअभावी आपत्ती व्यवस्थापनावर ‘आपत्ती’!

By admin | Updated: August 1, 2014 02:23 IST

अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी अत्याधुनिक साहित्याची गरज

अकोला : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हा चर्चेचा विषय झाली आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी, या यंत्रणेस अत्याधुनिक साहित्याची गरज असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने गुरुवारी केलेल्या पाहणीतून उजेडात आले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव गाडले गेल्याची माहिती बुधवारी सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास कळल्यानंतर, आपत्ती व्यवस्थापनाची चमू १0.३0 वाजताच्या सुमारास गावात दाखल झाली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यक साहित्यासह घटनास्थळावर तातडीने पोहोचणे गरजेचे असते, यावर या घटनेच्यानिमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. नैसर्गिक आपत्ती कधीही, कुठेही कोसळू शकते. आपत्ती व्यवस्थापन हे थेट लोकांच्या जीवन-मरणाशीच संबंधित आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी घेणे आता काळाची गरज बनली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम राजकीय आणि प्रशासकीय ने तृत्वाची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र काय स्थिती आहे, याची पाहणी ह्यलोकमतह्ण चमूने बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर केली. यंत्रणेकडे आवश्यक साहित्य असले, तरी आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी आणखी काही साहित्य गरजेचे असल्याचे यावेळी दिसून आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा समन्वयक एस.पी. साबळे यांनी अकोला तहसील कार्यालय परिसरात फायबर बोट ठेवण्यात आली असल्याची माहीती दिली. ही बोट वजनाने जड असून, आवश्यकता भासल्यास बोट वा परण्यात येते. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी या आवश्यक साहि त्याची मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कायमस्वरुपी एक वाहन, १५0 लाईफ जॅकेट, १५0 लाईफ रिंग हे साहित्य आवश्यक आहे. यासाठी जून महिन्यातच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले. *काय आढळले..?जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लोकमत चमूने बुधवारी रात्री १२.३0 वाजता. नियंत्रण कक्षाला भेटी दिली. यावेळी एस.पी. शेटे व आर. एस. निलपगारे उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ८. १0 वा. पुन्हा पाहणी केली असता चार कर्मचारी हजर होते. *मनपाचा नैसर्गिक आपत्ती निवारण क क्ष वार्‍यावर !अकोला : मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या कक्षासोब त समन्वय साधण्याची जबाबदारी मनपा अधिकार्‍यांना देऊन प्रत्यक्षात कारभार मात्र अग्निशमन विभागाकडे सोपविण्यात आला. सखल भागात पाणी साचल्यावर संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांनी दखल घेण्याची गरज आहे. तसे होत नसल्याने नागरिक त्रस्त असून, हा विभाग नेमक्या कोणत्या कामासाठी आहे, असा प्रश्न उ पस्थित होत आहे.पावसाळ्य़ात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी मनपा प्रशासनाच्यावतीने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम, नगर रचना, विद्युत विभाग, शिक्षण, जलप्रदाय व अतिक्रमण विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांनी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षासोबत समन्वय साधून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करणे, त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश दिले. मध्यंतरी मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले. पाणी वाहून जाण्यासाठी मनपाने ठोस उपाययोजना न केल्याने अद्यापही काही भागात पाणी कायम आहे.