शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांच्या ठरावाचे घोडे अडले बांधकाम विभागात!

By admin | Updated: November 22, 2015 02:29 IST

महापौरांची स्वाक्षरी झाली; प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा.

अकोला : नागरी दलित वस्ती सुधार योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसह दलितेतर व मूलभूत सुविधांसाठी प्राप्त कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या ठरावावर महापौर उज्ज्वला देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केल्यानंतर प्रशासनाने प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणे अपेक्षित होते. तूर्तास ठरावाचे घोडे बांधकाम विभागात अडल्यामुळे विकास कामांना कधी सुरुवात होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३ कोटी ९५ लाख रुपये प्राप्त झाले. यापूर्वी ७ कोटी रुपये मिळाले होते. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत २ कोटी ५0 लाख रुपये, दलितेतर योजनेंतर्गत ३ कोटी २३ लाख तसेच मूलभूत सुविधांसाठी २ कोटी ४0 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत संबंधित योजनांसाठी प्राप्त निधीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या निधीतून शहरामध्ये विकास कामे प्रस्तावित करण्याची सूचना प्रशासनाने सर्वपक्षीय नगरसेवकांना केली होती. त्यानुषंगाने नगरसेवकांनी प्रभागात सिमेंट व डांबरी रस्ते, नाल्या, पथदिव्यांसाठी खांब, पेव्हर ब्लॉक, शौचालये तसेच सभागृह उभारण्याच्या कामाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केले. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून त्यामधून अवाजवी कामे बाजूला सारण्याचे आयुक्त अजय लहाने यांचे स्पष्ट निर्देश होते. त्यानुषंगाने बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केले. यादरम्यान, संबंधित विकास कामांच्या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी न झाल्यामुळे कामे रेंगाळल्याचा सूर प्रशासकीय वतरुळात उमटत होता. दोन दिवसांपूर्वी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी संबंधित ठरावावर स्वाक्षरी करीत बांधकाम विभागाकडे पाठवून दिले. आता मात्र दोन दिवसांपासून सदर ठराव व प्रस्ताव या विभागात पडून आहे.