शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससी उत्तीर्ण देवानंदची प्रकृती गंभीर, पुन्हा एक कोटीची हवी मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

तेल्हारा : यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या देवानंद तेलगोटे याच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान ...

तेल्हारा : यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या देवानंद तेलगोटे याच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान त्याचे फुप्फुस निकामी झाले असून, फुप्फुस ट्रान्सप्लांट करण्यासाठी पुन्हा एक कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी सुहृद व दानशूर समाजाने पुढाकार घेत, मदतीचा हात द्यावा, असे आवाहन मित्र व नातेवाइकांनी केले आहे.

देवानंद सुरेश तेलगोटे हा आयआयटी मुंबई येथून बी.टेक. झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पास करून तो मुलाखतीस पात्र ठरला. एप्रिल महिन्यात दिल्ली येथे मुलाखतीसाठी गेला असता, त्याला तेथे कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनामुळे मुलाखत पुढे ढकलली. त्याच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात २८ एप्रिल ते १४ मेपर्यंत उपचार करण्यात आले; परंतु त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथून हैदराबाद येथील केआयएमएस हॉस्पिटलमध्ये एअर ॲम्ब्युलन्सने हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी १५ मे ते १३ जूनपर्यंत त्याच्या फुप्फुसामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी ईसीएमओ प्रक्रियेद्वारे उपचार केले. प्रकृतीत सुधारणा होत असताना, त्याला आयसीयूमधून बाहेर काढले होते; परंतु अचानक त्याचे हृदय बंद पडल्याने आणि फुप्फुस निकाली झाल्यामुळे तो आता व्हेंटिलेटरवर आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी देवानंदच्या कुटुंबीयांना फुप्फुस ट्रान्सप्लांट करावे लागेल आणि त्यासाठी १ कोटी रुपयांपर्यंत खर्च लागणार असल्याचे सांगितले. यापूर्वी त्याच्या मित्रांनी जमा केलेला एक कोटी रुपये निधी देवानंद याच्या उपचारावर खर्च करण्यात आला. देवानंद याच्या उपचारावर प्रत्येक दिवशी २ लाखांपर्यंत खर्च येत आहे. त्यामुळे समाजातील दानशूर, सुहृद नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन देवानंदच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्र परिवाराने केले आहे.

फोटो:

सुहृद समाजाने द्यावा मदतीचा हात...

देवानंद तेलगोटे याचे फुप्फुस ट्रान्सप्लांट करण्यासाठी १ कोटी रुपयांचा खर्च आहे. त्यामुळे दानशूर समाजाने त्याला मदतीचा हात देऊन त्याचा प्राण वाचवावा, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी सुमित कोठे

फोन पे, गुगल पे ८४४६७६९७०४, खाते क्रमांक ३३१३५५२४३९२ आयएफएससी कोड-एसबीआयएन ०००४८१८, सुरेश तेलगोटे (देवानंदचे वडील)

खाते क्रमांक ११५५५२२०५१४ आयएफएससी कोड- एसबीआयएन ०००४८१८ यावर आर्थिक मदत द्यावी. यासंबंधी अधिक माहितीसाठी शुभम गावंडे- ७०२१९२२०८४१ वर संपर्क साधावा.