शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नियम पाळूनही प्रशासन वेठीस धरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकोला : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियमानुसार काम करूनही या शाळांना प्रशासन जाणीवपूर्वक वेठीस धरत असून, प्रशासनालाच ...

अकोला : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियमानुसार काम करूनही या शाळांना प्रशासन जाणीवपूर्वक वेठीस धरत असून, प्रशासनालाच या कृत्याचा जाब विचारण्यासाठी आता संस्थाचालकांनी दंड थोपटले आहेत. याबाबतची बैठक गुरुनानक कॉन्व्हेंट येथे गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये शाळा संचालकांनी एकत्रितपणे प्रशासनाच्या विराेधात लढा देण्याचा संकल्प केला आहे.

कोरोनाच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाईन शिक्षण दिले. या कालावधीत काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार, ऑनलाईन शिक्षणाचा खर्च, इमारत भाडे, विजेचे बिल असा खर्च शाळांनी कुठून करायचा असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला. अनेक लोकप्रतिनिधीसुद्धा फी माफ करणे किंवा कमी करण्याबाबात शाळांवर दबाव आणतात. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार इंग्रजी शाळा फी आकारत असल्यावरही शाळांना दोष देण्यात येतो. तसेच शाळांबद्दल चुकीचे मॅसेज टाकून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची बदनामी करण्याचे काम काहीजण मुद्दाम करीत आहेत, असा आराेप यावेळी करण्यात आला. काेविडच्या काळात गत दोन वर्षांपासून शिक्षण व्यवस्था कोमात आहे. अशातच विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्य शाळांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे आणि शिक्षण विभागाचे चुकीचे धोरण यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, पालकांनी फी भरू नये असे न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना असे खोटे मॅसेज मोबाईलवर पसरविले जात आहेत याबाबत चर्चा झाली. यावेळी बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शाळांना येणाऱ्या आर्थिक अडचणींबाबत सर्व लोकप्रतिनिधींना इंग्रजी शाळांचे शिष्टमंडळ भेट देतील. शिक्षण विभागातील उद्भवणाऱ्या समस्यांबाबतसुद्धा शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीला अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी तालुक्यातील इंग्रजी शाळा संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुठल्याही इंग्रजी शाळेवर अन्याय झाल्यास त्या विरुद्ध संघटितपणे व एकजुटीने लढा देण्याचेही सर्वानुमते ठरविण्यात आले.