अकोला : महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित निघाल्याने इच्छुक महिला उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहे. काँग्रेसमधील इच्छुकांनी पक्ष श्रेष्ठींकडे धाव घेतली असून युतीतील शिवसेना-भाजपमधील इच्छूकांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मनपात सत्ता स्थापनेसाठी दोन्हीकडून प्रयत्न केले जात आहे. अशा परिस्थितीत युतीचे लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. पुढील अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निघाल्याने सत्तापक्षासह विरोधी पक्ष भाजप-सेनेने महापौरपद ताब्यात घेण्यासाठी तयारी चालवली आहे. काँग्रेस व राकाँ नगरसेवकांनी सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे आता आघाडीच्यावतीने महापौरपदासाठी कोण दावेदारी करेल, हा उत्सुकाचा विषय आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीनेह सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे साहजिकच, भाजप-सेनेतील इच्छुक महिलांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहे.
महापौर पदासाठी इच्छुकांचे देव पाण्यात!
By admin | Updated: August 19, 2014 00:57 IST