शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुरवठा खंडित!

By admin | Updated: May 24, 2017 01:18 IST

मुदतीत वीज बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील एकूण ४ लाख ५२ हजार २९४ ग्राहकांकडे वीज देयकाची ५७ कोटी ३२ लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. सदर ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा न केल्यास या ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असून, ग्राहकांनी त्वरित व मुदतीत थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.अकोला मंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे असलेल्या तीन विभागांमध्ये एकूण १ लाख ४९ हजार ४३१ ग्राहकांकडे १९ कोटी ५ लाख ९५ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये अकोला ग्रामीण विभाग ७५ हजार ११५ ग्राहकांकडे ८ कोटी ९ लाख ४४ हजार, अकोला शहर विभाग ३९ हजार २२१ ग्राहकांकडे ७ कोटी १५ लाख ४६ हजार, तर अकोट विभागातील ३५ हजार ९५ ग्राहकांकडे ३ कोटी ८१ लाख ४ हजार एवढी थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असून, विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.