शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा

By admin | Updated: July 8, 2016 02:09 IST

सत्र सुरू होऊनही धान्याचा पुरवठा नाही; पोषण आहार शिजविणारे मानधनाविना.

अकोला : मध्यान्ह भोजन (मिड डे मिल) योजनेंतर्गत पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये अनुदानाचा अडथळा निर्माण होत असल्याने या योजनेचा बोजवारा उडला आहे. २७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव थाटामाटात करणार्‍या प्रशासनाने पोषण आहार संबंधित शाळांना पोहोचविलाच नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील एकाही शाळेत पोषण आहाराचे वितरण झालेले नाही. त्यातच आता पोषण आहाराची माहिती दररोज ऑनलाइन अपडेट करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश शाळांवर पोहोचले आहेत. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांची कटकट आणखी वाढली असून, योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सरकारी व शासनमान्य अनुदानित शाळांमध्ये दुपारी मुलांना पोषण आहार पुरविण्याची योजना आहे. पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटांची असली, तरी योजनेचा आवश्यक तो लेखाजोखा ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेचे अनुदान वेळेवर मिळाले नाही, तर मुख्याध्यापकांना पोषण आहार शिजविणार्‍यांच्या मानधनापासून तर धान्य उपलब्ध करण्यासाठी उसनवारी करावी लागते. अकोल्या जिल्ह्यातील शाळांचे अनुदान हे गेल्या पाच महिन्यांपासून थकीत होते. अनुदान उपलब्ध असतानाही केवळ अनुदानाचे देयके सादर करता आली नसल्याने हे पाच महिन्यांचे एकत्रित अनुदान या आठवडज़ात देण्यात आले आहे. यावरून प्रशासनातील गलथानपणा समोर आला आहे. जिल्हा परिषदेला अनुदान उपलब्ध असेल तर ते त्याच महिन्यात तत्काळ निर्गमित करता आले, तर योजना राबविताना मुख्याध्यापकांनाही हात उसन्याचा कारभार करावा लागणार नाही.