शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या तपासणीचा बोजवारा

By admin | Updated: June 14, 2016 02:11 IST

अकोला जिल्हय़ातील १८४७ सिंचन विहिरींच्या पंचनाम्याचे अहवाल रखडले.

संतोष येलकर /अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हय़ातील १ हजार ८४७ सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिला होता; मात्र एकाही तालुक्यातील सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनाम्यासह तपासणी अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात सिंचन विहिरी कामांच्या तपासणीचा बोजवारा उडाला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. मंजूर करण्यात आलेल्या विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ात गत मे अखेर करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांपैकी किती विहिरींची कामे बोगस आहेत, सिंचन विहिरी गायब करण्यात आल्या काय, विहिरींची कामे कागदोपत्री दाखवून अनुदानाची रक्कम काढण्यात आली काय,अनुदान आणि मजुरीची रक्कम वाटप करण्यात आली की नाही, याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने गत मे २0१६ अखेरपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हय़ात करण्यात आलेल्या १ हजार ८४७ सिंचन विहिरींच्या कामांचे पंचनामे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी इत्यादींच्या संयुक्त चमूूमार्फत करून तपासणीचा अहवाल ७ जूनपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चारही उपविभागीय अधिकार्‍यांना गत ३१ मे रोजी दिला होता; परंतु १३ जूनपर्यंत जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाश्रीटाकळी, बाळापूर,पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तालुक्यांपैकी एकाही तालुक्यातील सिंचन विहिरींच्या कामांबाबत पंचनाम्यासह तपासणीचा अहवाल एकाही उपविभागीय अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागाकडे प्राप्त झाला नाही. सिंचन विहिरींच्या कामांचे पंचनामे आणि तपासणीचे काम अद्याप प्रलंबित असल्याने, जिल्हय़ातील सिंचन विहिरींच्या कामांचे पंचनामे आणि तपासणीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.