शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळ प्रतिबंधक तक्रार समित्यांचा बोजवारा

By admin | Updated: December 25, 2014 01:49 IST

केवळ दहा कार्यालयांमध्ये समित्या गठित; ३५ कार्यालयांचे अहवाल प्रलंबित.

अकोला : महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक (प्रतिबंधक) मनाई आणि इलाज अधिनियम २0१३ अंतर्गत प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये तक्रार निवारण समिती गठित करणे बंधनकारक आहे. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ दहा शासकीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समित्या गठित करण्यात आल्याचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला. उर्वरित ३५ कार्यालयांमधून तसा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. तक्रार निवारण समित्या गठित करण्याचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याची बाब समोर येत आहे.महिला काम करीत असलेल्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक (प्रतिबंधक ) मनाई आणि इलाज अधिनियम, २0१३ अन्वये प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये तक्रार निवारण समित्या गठित करणे आवश्यक आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील विविध ४५ शासकीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समित्या गठित करण्याचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत गत २0 ऑगस्ट रोजी देण्यात आले. संबंधित कार्यालयांतील वरिष्ठ पदावर असलेल्या महिला कर्मचार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गठित करावयाच्या या तक्रार निवारण समित्यांमध्ये किमान निम्मे सदस्य महिला; त्यापैकी एक अनुसूचित जाती व एक अनुसूचित जमातीमधील सदस्य आणि एक अशासकीय सदस्य असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विविध विभागांच्या ४५ शासकीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समित्या गठित करण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ दहा कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समित्या गठित केल्याचा अहवाल संबंधित कार्यालयांकडून जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. उर्वरित ३५ कार्यालयांकडून तक्रार समित्या गठित करण्यात आल्याबाबतचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक (प्रतिबंधक) मनाई आणि इलाज अधिनियम २0१३ अंतर्गत प्रत्येक शासकीय व निमाशासकीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समित्या गठित करण्यासाठी जिल्ह्यातील ४५ शासकीय कार्यालयांना पत्राद्वारे निर्देश देण्यात आले. समित्या गठित करण्यासाठी स्मरणपत्रही देण्यात आले. आतापर्यंत विविध विभागांतर्गत दहा कार्यालयांकडून तक्रार समित्या गठित करण्यात आल्याचे अहवाल प्राप्त झाले असल्याचे जिल्हा महिला, बाल विकास अधिकारी विशाल जाधव यांनी सांगीतले.