शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या गोदामात कपाशी बियाण्याचे शेकडो डबे पडून

By admin | Updated: July 18, 2016 23:39 IST

नांदुरा पं.स. पदाधिका-यांनी केला भंडाफोड.

नांदुरा (जि. बुलडाणा): गत वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी तालुक्यातील शेतकरी बियाण्यांसाठी पायपीट करत आहे. मात्र त्याचवेळी दुसरीक डे तालुका कृषी कार्यालयाच्या गोदामात खासगी बियाणे कंपनीचे कपाशीचे शेकडो डबे वितरित न झाल्यामुळे पडून आहे. हा भंडाफोड सभापती अनिल इंगळे व पंचायत समिती पदाधिकार्‍यांनी १८ जुलैच्या दुपारी कृषी विभागाच्या गोदामाची झाडाझडती घेऊन केला.तालुका कृषी कार्यालयाचे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गोदामात शेतकर्‍यांना वितरित न केलेले खासगी कंपनीच्या कपाशी बियाण्यांचे सुमारे पंधराशे डबे पडून असल्याची माहिती पंचायत समिती पदाधिकार्‍यांना समजली. त्यानुसार सभापती अनिल इंगळे, पं.स. सदस्य अर्चना शिवाजीराव पाटील, संतोष डिवरे, गणेश भोपळे सदस्य दुष्काळ निवारण समिती आदींनी तालुका कृषी कार्यालयाच्या गोदामाची झाडाझडती घेतली असता कपाशी बियाण्याचे पंधराशे डबे व देशी कपाशीचे बियाणे वितरित न केल्या गेल्यामुळे पडून असल्याचे दिसून आले. तालुक्यातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे आता पडून असलेल्या बियाण्यांचा फायदा काय? असा प्रश्न पंचायत समिती पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. यावेळी पंचायत समिती पदाधिकार्‍यांनी तालुका कृषी अधिकार्‍यांसोबत मोबाइलवरून संपर्क केला असता, ते महत्त्वाच्या बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे महागडे कपाशीचे बियाणे शेतकर्‍यांना मिळाले असते तर त्यांना या विपरीत परिस्थितीत या बियाण्यांचा पेरणीसाठी मोठा आधार झाला असता. मात्र कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सदर बियाणे पडून आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून वरिष्ठांनी तत्काळ संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती पदाधिकार्‍यांनी केली आहे.  महिनाभरापूर्वीच झाली कपाशीची लागवडगोदामात पडून असलेल्या खासगी कंपनीच्या बिटी बियाण्यांची बागायती शेतीत लागवड केली जाते, ती प्रामुख्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. त्यानुसार अशा वेळीच तालुक्यात कपाशीची लागवड झाली आहे. तर आता सोयाबीन व तुरीची लागवड शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे वितरित न झालेल्या बियाण्याची आता उपयोगीता काय? कृषी विभागाने बियाणे पेरणीच्या वेळेवर का वितरित केले नाही, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.सदर बियाणे जे शेतकरी बँकेचे थकबाकीदार असून, त्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांना वितरित केले जात आहे. हे बियाणे दहा दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहे.- एम.पी. स्वामी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी नांदुरा.