अकोला: जिल्हय़ात अल्प प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यानंतर कडाक्याच उन्हं तापत असल्याने डेंग्यूसदृश तापाची साथ असून, या ह्यव्हायरलह्णने अनेकांना हैरान केले आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांवर थातूर-मातूर उपचार करून सुटी देण्यात येत असली तरी खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर या आजारावर नेमका उपचार करण्यास अडचणीत सापडले आहेत. यावर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.रुग्णांवर उपचार करताना आजाराचा अंदाज घेऊन उपचार करण्यात येत असून, एकसारखी लक्षणे असलेली दोन रुग्ण असल्यास आणि त्यांच्यावर सारखाच औषधोपचार केल्यानंतर एक रुग्ण ठणठणीत होत असून, दुसरा रुग्ण १५ ते २0 दिवस दवाखान्यात भरती केल्यानंतरही तो बरा होत नसल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या व्हायरलमुळे नेमका कशाप्रकारे औषधोपचार करावा, याबाबत डॉक्टरही गोंधळात पडले असून, यावर आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. आजार डेंग्यूसदृश तापाचा व्हायरल असल्याचे प्रथम निदान करताना डॉक्टरांच्या निदर्शनास आले असून, हा आजार नागरिकांसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले. वातावरणातील बदल रोगराईस आमंत्रण देत असून गेल्या ८ दिवसांपासून उन्हाळय़ाप्रमाणे तापमानाचा पारा चढतो आहे. या वातावरणाने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, ५ वर्षांंआतील बालकांच्या शरीरात इन्फेक्शन होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन, रात्री गारवा अन् अधून-मधून पावसाची हजेरी; या बदलामुळे जिल्हय़ात मलेरिया व डेंग्यू सदृष्य तापाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही रुग्णांनी हाऊसफुल्ल आहेत. शहरासह जिल्हय़ातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठय़ाने साथीच्या आजारांचा प्रकोप झाला आहे. सवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू असून, खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. यामध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृश ताप, सर्दी ताप, डोकेदुखी, मलेरिया व डायरियाच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे.डेंग्यूसदृश तापाच्या व्हायरलने अनेकांना ग्रासले आहे. नेमके निदान होत नसल्याने डॉक्टरही हतबल झाले आहेत.** लहान मुलांना 'सेल्फ लिमिटिंग इन्फेक्शन'जिल्हय़ात सध्या व्हायरलचे रुग्ण प्रचंड प्रमाणात आढळून येत आहे. त्यातच ६ महिने ते ५ वर्ष व त्यावरील वयोगटातील बालकांना ह्यसेल्फ लिमिटिंग इन्फेक्शनह्ण होत असल्याचे आढळून आले आहे. हा आजार एका विशिष्ट कालावधीपर्यंंत मुलांच्या शरीरात राहत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. हा विशिष्ट कालावधी झाल्यानंतर मुले आपोआप ठणठणीत होत आहेत. हा आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि शुद्ध पाणी आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ** घाण पाण्यामुळे वाढणारे आजारशहरातील घाण पाण्यामध्ये एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून, यापासून डेंगी ताप, मलेरिया, डायरिया, सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंगी हिमोरेजीक फिवर, डेंगी शॉक सिंड्रोम या आजारांमध्ये वाढ झाली आहे. शहरासह जिल्हय़ात धूर फवारणी होत नसल्याने मेंदूचा हिवताप, उलट्या, जलशुष्कता, नाक व तोंडातून रक्त येणे, त्वचेवर डाग पडणे, रक्तदाब कमी होणे यासारख्या आजारांची लागत होत असल्याचे आढळून आले आहे.
अकोला जिल्ह्यात डेंग्यूसदृश ‘व्हायरल’
By admin | Updated: August 19, 2014 01:21 IST