शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये डेंग्यू, जलजन्य आजारांचे थैमान

By admin | Updated: October 29, 2014 01:47 IST

१५ जणांचा मृत्यू, १00 वर रुग्ण पॉझिटिव्ह.

सचिन राऊत/अकोला

         वातावरणातील बदल आणि साचलेल्या पाण्यामध्ये झालेल्या डासांच्या उत्पत्तीने जिल्ह्यातील तब्बल २४७ गावांमध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृश आजार आणि जलजन्य आजारांचे थैमान माजले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभागाने या गावांची तपासणी केली असून, ही सर्व गावे ह्यरेड झोनह्णमध्ये टाकण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील २४७ गावांत डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत जवळपास १५ जणांचा डेंग्यूने बळी घेतला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये १00 हून अधिक रुग्णांच्या तपासणीत डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचा प्रचंड उद्रेक झाला असताना आरोग्य विभागाने कागदोपत्रीच उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. ग्रामीण भागात डास प्रतिबंधक धूरळणी व ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नसून, शहरातही प्रचंड घाण साचली आहे. या दोन्ही बाबींच्या परिणामी डासांची प्रचंड प्रमाणात उत्पत्ती होत असून, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. दरम्यान, २४७ गावांतील प्रत्येक दोन ते तीन घरांमागे एक डेंग्यूचा रुग्ण आढळून येत आहे. त्यामूळे अकोला शहर, आकोट व तेल्हारा तालुका आणि बाळापूर शहर ह्यरेड झोनह्णमध्ये टाकण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, तर नागरिकांनीही आपल्या घराच्या आजूबाजूला कचरा केला. गवत व इतर कचर्‍यामूळे डासांचे प्रमाण वाढत असून, परिणामी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. डासांपासून बचाव करण्याची गरज असून, आरोग्य विभागासोबतच नागरिकांनी साफसफाई ठेवल्यास या आजारावर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. डेंग्यू आणि डेग्यूसदृश आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. यामधील बहुतांश रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळत असून, काहींना मात्र केवळ साधा ताप असल्याचेही समोर येत आहे डेंग्यू तापासोबतच व्हायरल ताप आणि अँलजिर्क तापाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामूळे ताप किंवा शरीरावर कुठेही सूज आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा अवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी यांनी केले आहे.