शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदा रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

बाल संरक्षण समितीची कार्यशाळा अकोट: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत बाल संरक्षण समितीचे सदस्य असलेल्या पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांची बुधवारी ...

बाल संरक्षण समितीची कार्यशाळा

अकोट: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत बाल संरक्षण समितीचे सदस्य असलेल्या पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांची बुधवारी कार्यशाळा अकोली जहाँगीर येथे घेण्यात आली. कार्यशाळेत ठाणेदार ज्ञानोबा फड, बाल संरक्षण कक्षाचे सतीश राठोड, सुनील सरकटे, योगेंद्र खंडारे यांनी मार्गदर्शन केले.

दानापूर येथे जल दिन साजरा

दानापूर: दानापूर ग्रामपंचायतीतर्फे जलदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्यांनी जलदिनानिमित्त शपथ घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे, धम्मपाल वाकोडे, योगेश येऊल, मनोज चौबे, अशोक राहणे, बाळूभाऊ श्रीनाथ, राम हागे, गणेश खडसान आदी उपस्थित होते.

मूर्तिजापूर बाजार समिती बंद

मूर्तिजापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ३० अडत दुकानदार व हमालांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे काही दिवसांसाठी बाजार समितीमधील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. आयोजित शिबिरात अडते, हमाल यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

बोरगावात ३५ ज्येष्ठांनी घेतली लस

बोरगाव मंजू: येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात ३५ ज्येष्ठांना लस देण्यात आली. यावेळी डॉ. राहिमीन खान, डॉ. श्रृती गिऱ्हे, डॉ. भगत, आनंद डामरे, जयेश लांडगे आदी लसीकरण मोहीम राबवित आहेत.

पिंजर येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

पिंजर: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीर होऊन वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे प्रयत्न सुद्धा अपुरे पडत असल्याचे चित्र पिंजर गावात दिसत आहे.

आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची मनमानी

बोरगाव मंजू: आरोग्य केंद्रात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी जात असून, येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तपासणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

खेल देशपांडे येथे जुगारावर छापा

अडगाव: तेल्हारा तालुक्यातील खेल देशपांडे येथे सुरू असलेल्या जुगारावर ठाणेदार नितीन देशमुख यांनी गुरुवारी छापा घालून आरोपी निखिल अग्रवाल (३०), नितीन गवारगुरू(३० रा. उबारखेड) यांच्याविरुद्ध कारवाई करून रोख तीन हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

टाकळी खुर्द येथे गणवेश वितरण

चोहोट्टा बाजार: अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी खु. येथे शाळा समिती अध्यक्ष तसलिम शहा, सरपंच मंगेश ताडे यांच्या हस्ते २४ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आढे, जयश्री जाधव, मंदा आढे उपस्थित होते.

महिलेस मारहाण, गुन्हा दाखल

तेल्हारा: तालुक्यातील उबारखेड पंचगव्हाण येथील ललिता तायडे व तिच्या मुलास आरोपी श्रीधर गवारगुरू, सुरेश गवारगुरू, रूपाली गवारगुरू यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी गुरुवारी तेल्हारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.