लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीएसटी परिषदेने रिटर्नचा विलंब शुल्क माफ केल्याने अकोल्यातील अनेक उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. रिटर्नचा भरणा करण्याची शेवटची तारिख २५ ऑगस्ट होती. मात्र सव्हर्र डाऊन आणि अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परिषदेने विलंब शुल्क माफ केले आहे. परिषदेच्या या निर्णयामुळे. अकोल्यातील उद्योजकांना त्याचा लाभ होणार असल्याचे या निर्णयाचे स्वागत होत आहे.सरकारने जुलै महिन्याच्या जीएसटी रिटर्न शेवटच्या तारखेपर्यंत (२५ ऑगस्ट) न भरू शकणार्यांना विलंब शुल्क माफ केला आहे. पण थकित करावर व्याज भरावे लागणार आहे. पहिल्या रिटर्नमध्ये झालेल्या चुका दुरूस्त करण्याची संधी दिली गेली असून ५ सप्टेंबरपर्यंत हा रिटर्न भरणे आवश्यक आहे. देशाचे अ थर्मंत्री अरूण जेटली यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. जीएसटी रिटर्न दाखल न केल्यास २00 रूपयांचा विलंब शुल्क लागणार होता.यातील राज्य आणि केंद्राच्या जीएसटीला प्रत्येकी शंभर रूपये जाणार होते.तसेच उशीरा करभरणा केल्यास १८ टक्के व्याज दंडाच्या स्वरूपात आहे. मात्र जुलैचा विलंब शुल्क माफ झाल्याने अनेक उद्योजकांचे कोट्यवधी रूपये वाचले आहेत. आ ता सप्टेंबर पर्यत किती उ्दयोजक या योजनेचा लाभ घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
जीएसटी रिटर्नचा विलंब शुल्क माफ झाल्याने उद्योजकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:37 IST
जीएसटी परिषदेने रिटर्नचा विलंब शुल्क माफ केल्याने अकोल्यातील अनेक उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. रिटर्नचा भरणा करण्याची शेवटची तारिख २५ ऑगस्ट होती. मात्र सव्हर्र डाऊन आणि अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परिषदेने विलंब शुल्क माफ केले आहे. परिषदेच्या या निर्णयामुळे. अकोल्यातील उद्योजकांना त्याचा लाभ होणार असल्याचे या निर्णयाचे स्वागत होत आहे.
जीएसटी रिटर्नचा विलंब शुल्क माफ झाल्याने उद्योजकांना दिलासा
ठळक मुद्देरिटर्नचा भरणा करण्याची शेवटची तारिख २५ ऑगस्ट होती सव्हर्र डाऊन आणि अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विलंब शुल्क माफ