तेल्हारा : शेतातून मजुरी करून परत येताना तलावात आंघोळीसाठी गेलेल्या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आकोली रुपराव येथे शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घडली.हिवरखेड पोलीस स्टेशनाअंतर्गत येत असलेल्या आकोली रुपराव येथील शरद रमेश तायडे हा विद्यार्थी आपल्या मित्रासह शेतमजुरी करण्यासाठी गेला होता. शेतातून घरी परत येताना काळेगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात ५ मित्रासह शरदही आंघोळ करण्यासाठी तलावात उतरला असता तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी गावात सांगताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील श्याम तळोकार, जीवन तायडे, गजानन तायडे, माणिकराव लासुरकार व अन्य नागरिकांनी तलावात तब्बल ४ तास शोध घेत शरदचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतक शरद हा डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत होता. घटनेची माहिती आकोली येथील पोलीस पाटील बुरघाटे यांनी हिवरखेड पोलिसांना दिली. ठाणेदार अनंत पुर्णपात्रे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली. तेल्हारा तहसीलदार सचिन पाटील, तलाठी शिलानंद तेलगोटे, बीट जमादार भगवान पाटील घटनास्थळावर उपस्थित होते. यावेळी बेलखेडचे माजी सरपंच मोहन गोमासे, आकोलीचे सरपंच जनार्दन ढोकणे घटनास्थळावर होते.
तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: August 23, 2014 02:17 IST