शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर येथील अल्पभूधारक शेतमजुराचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Updated: May 29, 2017 19:38 IST

पातूर : नजीकच्या खानापूर येथील एका अल्पभूधारक शेतमजुराचा २८ मे रोजी सायंकाळी स्वाइन फ्लूच्या आजारावर उपचार सुरू असताना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला.

पातूर : नजीकच्या खानापूर येथील एका अल्पभूधारक शेतमजुराचा २८ मे रोजी सायंकाळी स्वाइन फ्लूच्या आजारावर उपचार सुरू असताना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने पातूर शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.पातूरनजीकच असलेल्या खानापूर येथील रहिवासी देवलाल तुळशिराम शिरसाट (५५) यांचा २८ मे रोजी सायंकाळी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसा अहवालसुद्धा देण्यात आला आहे. ते आजारी पडल्यामुळे त्यांना २३ मे रोजी पातुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आला; परंतु त्यांना सर्दी, पडसे, खोकला व ताप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी २५ मे रोजी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या करण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल २८ मे रोजी रुग्णालय प्रशासनास प्राप्त झाला होता. त्या अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाला असल्याचे नमूद करण्यात आले होते. हा अहवाल प्राप्त झाल्याच्या दिवशीच सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा आप्त परिवार आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी पातुरातील गुरुवारपेठ भागात राहणारे मनीष त्र्यंबक काळपांडे यांचा १५ एप्रिल रोजी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. त्या घटनेला एक महिना उलटला नाही तोच पातूर तालुक्यातील खानापूर येथील देवलाल शिरसाट यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पातूर तालुक्यात स्वाइन फ्ल्यू पसरत असल्याचे स्पष्ट होत असून, पातूर शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.