शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढण्याच्या धसक्याने व्यावसायिकाचा मृत्यू

By admin | Updated: October 30, 2014 01:10 IST

व्यापारी आक्रमक: टिळक रोडवरील दुकाने बंद; मनपाविरुद्ध पोलिसात तक्रार

अकोला: अतिक्रमण काढल्या जाण्याच्या धक्क्याने व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास टिळक रोडवर घडली. या घटनेचा निषेध म्हणून टिळक रोडवरील व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली आणि शेकडो व्यापार्‍यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेऊन महापालिका अतिक्रमण विभागाविरुद्ध तक्रार दिली. सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली परिसरात राहणारे देवानंद चेतनदास थदानी (४५) यांची जुन्या कापड बाजारातील पोलिस चौकीसमोर फोटो फ्रेमिंगची छोटीशी दुकान आहे. बुधवारी दुपारी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने टिळक रोड भागात फिरून अतिक्रमणधारकांना दुकाने हटविण्यास बजावल्याने व्यापार्‍यामध्ये खळबळ उडाली. अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली. दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी व कर्मचारी देवानंद थदानी यांच्या दुकानावर आले. त्यांना अतिक्रमण तातडीने हटविण्यास सांगितले. अतिक्रमण न काढल्यास, दुकानातील साहित्य जप्त करण्याचा इशारा दिला. दरम्यान, मनपा अतिक्रमण पथक व देवानंद थदानी यांच्यात बाचाबाची झाली. आता आपले अतिक्रमण हटविले जाणार, या धसक्याने देवानंद थदानी हे जागेवरच कोसळले. घटनास्थळावरील नागरिक व व्यापार्‍यांच्या मदतीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच टिळक रोड, जुना कापड बाजारातील व्यापार्‍यांनी एकत्र येऊन महापालिका अतिक्रमण विभागाचा निषेध म्हणून परिसरातील दुकाने बंद केली आणि व्यापार्‍यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. थदानी यांच्या चुलत भावाने अतिक्रमण विभागाविरुद्ध तक्रार दिली. उशिरा सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.