शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या खिडकीवर डोके आदळल्याने भाजप प्रदेश पदाधिकार्‍याचा मृत्यू

By admin | Updated: July 10, 2014 01:28 IST

वाशिम येथील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य कैलास जुनघरे

अकोला : एसटी बसमध्ये जागा पकडण्याच्या धावपळीत बसच्या खिडकीवर डोके आदळल्याने भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कैलास जुनघरे यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३0 वाजता अकोल्यातील नवीन बसस्थानकावर घडली. वाशिम येथील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य कैलास जुनघरे हे बुधवारी दुपारी बसने अकोल्यात आले. त्यांची मुलगी शरयू ही अकोल्यामध्ये इयत्ता ११ वीमध्ये शिकते. तिला पुस्तके घेऊन देण्यासाठी ते बाजारात गेले. त्यांनी मुलीला पुस्तके खरेदी करून दिले. मुलीच्या खोलीवर गेले. तिची भेट घेतली आणि वाशिमला परत जाण्यासाठी ते नवीन बसस्थानकावर आले. वाशिमची बस आल्यावर ते बसकडे धावले. बसमध्ये जागा मिळण्यासाठी खिडकीतून रूमाल टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान त्यांचे डोके खिडकीवर आदळल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉ क्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कैलास जुनघरे यांनी अभाविपच्या माध्यमातूनच राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्याकडे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी होती. ११ वर्ष भाजपाचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. वाशिममधील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत ते शिक्षक होते. त्यांच्या पश्‍चात मुलगी शरयू, मुलगा शिवम, पत्नी, भाऊ, आई-वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.