शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची छाया गडद!

By admin | Updated: October 9, 2015 02:01 IST

शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आज बुलडाण्यात.

खामगाव : गत तीन वर्षांंपासून सातत्याने ओल्या व कोरड्या अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यात कृषिमाल उत्पादनातील घट, चार हंगामांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना बसलेला फटका आणि अवर्षणसदृश स्थितीत बुलडाण्यात शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा पाहता, जिल्ह्यात दुष्कळसदृश स्थि तीची छाया गडद झाली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकरी आत्महत्या हा विषय केंद्रस्थानी ठेवून कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी बुलडाण्यात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पंधरा वर्षांंमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा सुमारे १६00 वर पोहोचला असताना जिल्ह्यातील कृषी, सिंचन, मत्स्य, वैरण विकास यांसह अन्य विभागांची एकत्रित बैठक घेऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या जिल्ह्यातील अँक्शन प्लॅनवर साधकबाधक चर्चा होतेय. एकीकडे जलचक्रातील अनियमितता शेतकर्‍यांना मारक ठरत आहे. गेल्या तीन वर्षांंपासून हवामानाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना धोका दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये बैठक घेत जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग, शिक्षण विभाग, कृषीसह संबंधित खात्याचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात ८ ऑक्टोबरला दिवसभर धावपळ होती. जिल्ह्यातील शे तकरी आत्महत्या रोखण्यासाठी बनविण्यात आलेल्या अँक्शन प्लॅनच्या अनुषंगाने येत्या काळात करण्यात येणार्‍या उपायोजनांचा आराखडा बनविण्यात अधिकारी वर्ग व्यस्त होता. पश्‍चिम विदर्भात बुलडाण्याची स्थिती बिकट असून, सिंचनाचा पाच हजार कोटींचा अनुशेष पाहता, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होतो का, याकडे लक्ष लागून आहे.