शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सायबर कॅफेवर दामिनी पथकाचा छापा

By admin | Updated: June 28, 2016 02:18 IST

डाबकीरोड स्थित मातोश्री सायबर कॅफेवर छापा, कॅफेमालक व युवतीला घेतले ताब्यात.

अकोला: डाबकी रोडवरील गणेश नगरमधील मातोश्री सायबर कॅफे प्रेमी युगुलांचा अड्डाच झाल्याच्या माहितीवरून दामिनी पथकाने सोमवारी सायंकाळी या सायबर कॅफेवर छापा मारला. यावेळी कॅफेचा मालक योगेश ढोरे व एका युवतीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर डाबकी रोड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. गणेश नगरमध्ये योगेश जनार्दन ढोरे याच्या मालकीचा मातोश्री सायबर कॅफे असून या ठिकाणी प्रेमी युगुलांची मोठी रेलचेल असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. त्यानंतर दामिनी पथकाने या सायबर कॅफेवर गत काही दिवसांपासून पाळत ठेवली असता या कॅफेत प्रेमी युगुलांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था असल्याचे समोर आले. यासोबतच प्रेमी युगुलांना कॅफेमध्ये बसण्यासाठी विशेष दरही आकारण्यात येत होता. मातोश्री सायबर कॅफेमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील चाळेही चालत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने तब्बल १५ ते २0 दिवस पाळत ठेवली, या ठिकाणच्या गैरकृत्याचा विश्‍वास पटल्यानंतर सोमवारी सायंकाळी छापा घातला. यामध्ये योगेश ढोरे हा एका युवतीसोबतच सायबर कॅफेमध्ये बसलेला असल्याचे दिसल्यानंतर त्याच्यावर आणि एका युवतीवर डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सदर सायबर कॅफेमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे चालत असल्याच्या तक्रारीही परिसरातील नागरिकांनी केल्याची माहिती आहे.