शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

डॅडी देशमुख जीवन गाैरव पुरस्काराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST

अकोला : स्व. बाबूराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी येथे पार पडला. ...

अकोला : स्व. बाबूराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ यांना डॅडी देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्काराने पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, महापौर अर्चनाताई मसने, माजी आमदार तुकाराम बीडकर, बल्लूभाऊ जवंजाळ, प्रा.डॉ. संतोष हुसे तसेच संयोजन समितीचे प्रा. मधू जाधव, संजय खडपकर, सदाशिव शेळके, अशोक रहाटे, प्रशांत देशमुख तसेच देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, कला क्षेत्रात युवक- युवतींनी पुढे यावे. जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नव्या जोमाच्या तरुण-तरुणींनी अकोल्याचा कला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक करावा, हे डॅडी देशमुखांचे स्वप्न पूर्ण करावे, असं आवाहन केलं.

सन्मानार्थी अरुण घाटोळे यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले की, रंगभूमी ही माणसाला वास्तविक माणूस म्हणूनच दाखवते. माणसाला माणूस म्हणून दाखवणाऱ्या या वास्तव माध्यमातच मी काम केले. नाटकातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्य रमेश थोरात, माहितीपट निर्माते डॉ. राजेश देशमुख, सौंदर्य स्पर्धा विजेती कु. पूजा विष्णू मुळे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात महापौर मसने यांनी शहरातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन देण्यासाठी सहयोग देऊ, असे सांगितले.

प्रास्ताविक तुकाराम बीडकर यांनी केले. प्रा. मधू जाधव यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले. आभार प्रदर्शन सदाशिव शेळके यांनी केले.