शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून उभ्या झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 20:16 IST

Murtizapur News : १८ मे रोजी चार महाकाय निंबाच्या झाडाची बुडापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील महावितरणच्या  माना उपविभाकडून मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतू माना सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या माना गावातील १८ मे रोजी चार महाकाय निंबाच्या झाडाची बुडापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे.             माना सबस्टेशन अंतर्गत वीज तारांजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून तारे जवळची जागा मोकळी करण्याचा कार्यक्रम चालू असताना त्यांनी तसे न करता मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या न छाटता शंभर - दोनशे वर्षापूर्वीचे   चार कडूनिंबाचे झाडे बुडापासून जमिनदोस्त केली आहे. शासन एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम युध्दस्तरावर राबवित असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विनापरवाना महाकाय महाकाय वृक्षाची कत्तल करण्यात येत असल्याने गावकऱ्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात माना वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कमलेश मस्के यांना व मूर्तिजापूर येथील उपकार्यकारी अभियंता मनोज खांडरे यांना यासंदर्भात अवगत केले असता आम्ही घटनास्थळावर जावून पाहीले नाही व झाडे बुडापासून तोडल्याची आपल्याला कल्पना नसल्याचे लोकमतशी बोलताना सांगून कानावर हात ठेवले. वास्तविक मान्सूनपूर्व नियोजन म्हणून झाडाच्या फांद्या छाटने अपेक्षित असताना त्यांच्या कडून संपूर्ण झाडाची कत्तल होत असल्याने माना येथील उपसरपंच मंगेश वानखडे यांनी तहसीलदार मूर्तिजापूर व पोलीस स्टेशन माना येथे वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुठलीही परवानगी न घेता झाडाची कत्तल करणे गंभीर बाब असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे. मान्सूनपूर्व तयारी करताना आम्ही झाडे बुडापासून कधीच तोडत नाही. केवळ झाडाच्या फांद्या छाटल्या जातात. असे झाले असेल तर त्याची चौकशी करु.

-मनोज खांडरेउपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी, मूर्तिजापूर --सदर विभागाने ग्रामपंचायत ची आणि वनविभागाची परवानगी घेणे अपेक्षित होते.तलाठी,मंडळ अधिकारी यांचा पंचनाम्यासह अहवाल मागवून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल.

-प्रदीप पवार तहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :mahavitaranमहावितरणMurtijapurमुर्तिजापूर