अकोला : पीक विमा हा जोखमीवर आधारित असून, उंबरठा उत्पादनाच्या आधारावर नुकसान भरपाई ठरविली जाते. या योजनेंतर्गत एका महसूल मंडळाअंतर्गत येणार्या १0 शेतकर्यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग घेतले जातात. या पिकांची कापणी मात्र कृषी अधिकारी, गावचे सरपंच, पोलिस पाटील, गावकरी, शेतकर्यांसमोर करणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून शेती गटातील उत्पन्न कमी आल्यास शेतकर्यांना संरक्षित रक्कम नुकसान भरपाईच्या स्वरू पात दिली जाते. ही एकमेव योजना गावकरी व शेतकर्यांच्या हातात असल्याने पीक कापणीच्या वेळी शेतकर्यांना दक्ष राहण्याची खरी गरज आहे. त्यामुळे ही योजना शेतकर्यांसाठी संकटमोचक असल्याचा सूर लोकमत परिचर्चेला उपस्थित तज्ज्ञांमध्ये उमटला. लोकमतच्यावतीने मंगळवारी ह्यशेतकर्यांसाठी पीकवीमा योजना फायदे व तोटेह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, नायब तहसिलदार बी.झेड सोनोने, तालुका कृषी अधिकारी के.आर. चौधरी, नवृत्ती कृषी अधिकारी कुंवरसिंह मोहने, प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख आदी सहभागी झाले होते. परिचर्चेत सहभागी वक्त्यांनी शेती हा शेतकर्यांचा आत्मा आहे. शेती वर त्याचे संपूर्ण जीवन अवंलबून आहे. आणि म्हणूनच शेतीला संरक्षण मिळावे ही त्याची अपेक्षा असते. आणि या दृष्टिकोणातूनच पीक विमा योजना गरजेची असल्याचे सांगितले. पीक विमा शेतकर्यांना संरक्षण तर देतोच सोबतच आशावादी देखील बनवितो. सध्या शेती निसर्गाच्या लहरीवर अवलंबुन झालेली आहे. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ शेतकर्याच्या वाट्याला येतो. यामध्ये शेतकरी होरपळ्या जातो आणि त्याच्यावर संकट कोसळते. संकटातुन बाहेर निघण्यासाठी शेतकर्याला पर्याय नसतो. अशावेळी शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतो. शेतकर्यांचा निराशावादी दृष्टिकोण दूर होऊन त्याच्यात आशा निर्माण व्हावी आणि त्याने शेतीच्या कामात अधिक जोमाने भिडावे यासाठी त्याला दिलासा म्हणून शासनाने पीक विमा सारखी योजना आणली आहे. ही योजना शेतकर्यांसाठी निश्चित फायदेशीर ठरणारी आहे असे आशावाद वक्त्यांनी व्यक्त केला. शासनाचे प्रतिनिधीत्व करणार्या अधिकार्यांनी पीक विमा योजनेचे महत्त्व शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले असल्याचे सांगितले. अनेक शेतकर्यांना ते पटले असून त्यांनी पीक विमा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे सांगितले. शेतकर्यांचे प्रतिनिधीत्व करणार्या वक्त्यांनी खरोखरच ही पीक विमा योजना शेतकर्यांसाठी संकटमोचक बनली असल्याचे सांगितले.
पीक विमा शेतकर्यांसाठी संकटमोचक!
By admin | Updated: July 30, 2014 01:20 IST