शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाचे होणार सर्वेक्षण!

By admin | Updated: October 23, 2016 02:20 IST

अकोला जिल्हाधिकार्‍यांचा महसूल, कृषी यंत्रणेला आदेश

अकोला, दि. २२- परतीच्या पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या पीक नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) व तालुका कृषी अधिकार्‍यांना शुक्रवारी दिला.गत ४ ऑक्टोबरपर्यंत जिल्हय़ात परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच उडीद व कापूस पिकाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, गत दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर यावर्षीच्या खरीप हंगामात गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टी, वादळी वारे व पुरामुळे शेती पिके व फळपिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालक (विस्तार शिक्षण)मार्फत १९ ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुषंगाने गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्हय़ातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या नुकसानासह खरबडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल ता तडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिला. तालुका स्तरावरील संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करण्याचा आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.संयुक्त पथकांद्वारे होणार सर्वेक्षण!जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठय़ांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकांद्वारे करण्यात येणार आहे.शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा!परतीच्या पावसामुळे जिल्हय़ात सोयाबीन, उडीद व कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, पीक नुकसानाचे सर्वेक्षण आणि शासनामार्फत पीक नुकसानभरपाईपोटी मदत केव्हा मिळणार, याबाबत शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.