शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘क्राइम मिटिंग’ला ठाणेदारांच्या आधी पोलीस अधीक्षक हजर

By admin | Updated: May 23, 2017 01:04 IST

अकोला:‘क्राइम मिटिंग’ला ठाणेदारांच्या आधीच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हजेरी लावल्याने उशिरा येणाऱ्या ठाणेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गत आठ दिवसांमध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन तपासणी केल्यानंतर सोमवारी शहरासह जिल्ह्यातील ठाणेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती; मात्र सदर बैठकीला ठाणेदारांच्या आधीच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हजेरी लावल्याने उशिरा येणाऱ्या ठाणेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.पोलीस अधीक्षक दर महिन्यातून एक दिवस जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदारांची क्राइम मिटिंग घेतात. या बैठकीमध्ये महिन्याभरातील गुन्हेगारीचा आढावा, घडलेल्या मोठ्या घटनांबाबत कोणती कारवाई केली, या संदर्भात माहिती घेण्यात येते. त्यामुळे दर महिन्याला घेण्यात येणारी क्राइम मिटिंग अधिकाऱ्यांसाठी फार महत्त्वाची असते. नव्याने पदभार स्वीकारणारे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सोमवारी पहिल्यांदाच क्राइम मिटिंग बोलाविली. या बैठकीची वेळ सकाळी दहा वाजता होती. त्यापूर्वी सर्वच अधिकाऱ्यांनी पोहोचणे बंधनकारक होते; मात्र शहरासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि ठाणेदार पोलीस अधीक्षकांपेक्षा उशिराने या बैठकीला पोहोचल्याने त्यांना या बैठकीचे किती गांभीर्य आहे, हे दिसून आले. या बैठकीच्या ५ मिनिट आधीच पोलीस अधीक्षक कलासागर पोलीस मुख्यालयातील सभागृहात पोहोचले. ते ज्यावेळी सभागृहात आले त्यावेळी तिथे कोणतेच अधिकारी आलेले नव्हते. त्यामुळे ही वार्ता मुख्यालयातील निरीक्षकांना कळताच त्यांनी शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही ठाणेदारांना यासंदर्भात माहिती देऊन तत्काळ पोहोचण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक मुख्यालयात पोहोचल्याचे कळताच बैठकीला पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बैठकीला सुरुवात होताच पोलीस अधीक्षक कलासागर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदारांना परिसरातील अवैध धंदे बंद करण्याचे कडक आदेश दिले. त्यासोबतच जी घटना असेल त्याबाबत खरी माहिती देण्याचेही सांगितले. हद्दीमध्ये पायी पेट्रोलिंग करण्याचेही आदेश दिले असून, आगामी काळात येणाऱ्या धार्मिक सणांमध्ये गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे आदेश दिले. गुंडप्रवृत्तींच्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.