शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीत गोंधळ; पराभूत उमेदवारांचा ‘एल्गार’!

By admin | Updated: February 25, 2017 02:23 IST

फेरमतदान घेण्याची मागणी; कलेक्टर बंगल्यावर धडक

अकोला, दि. २४- महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, भाजप वगळता विविध राजकीय पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी एल्गार पुकारला. राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी शुक्रवारी कलेक्टर बंगल्यावर धडक देऊन, मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रियेत ईव्हीएममध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलविण्यात आले, असा आरोप करीत, निवडणुकीत पराभूत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीतील गोंधळाविरुद्ध ह्यएल्गार पुकारला. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व शिवसेना इत्यादी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकारी बंगल्यावर धडक देत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीत झालेला निर्णय अमान्य असून, ईव्हीएम ताब्यात घेऊन ह्यसीलह्ण करण्यात याव्या व यासंदर्भात सखोल चौकशी करून महानगरपालिका निवडणुकीसाठी मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणीही विविध राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, मदन भरगड, अविनाश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार मुलचंदाणी, भारिप-बमसंचे बालमुकुंद भिरड, बुद्धरत्न इंगोले, वंदना वासनिक, शिवसेनेचे तरुण बगेरे, नंदू ढोरे, नकुल ताथोड, प्रल्हाद ढोरे यांच्यासह पराभूत उमेदवार उपस्थित होते.एका उमेदवाराला एकच मत; दुसर्‍याला केवळ २0 मते!महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्र.१३ मध्ये उमेदवार नंदू ढोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ज्या मतदान केंद्रावर मतदान होते, त्या केंद्रावर ढोरे यांना केवळ एक मत मिळाले. तसेच दुसरे उमेदवार पंकज उपाध्ये यांचे व त्यांच्या कुटुंबीयांची मतदान केंद्र क्र.१९ व २0 मध्ये १00 मते आहेत. त्यांनी मतदान केले असताना उपाध्ये यांना केवळ २0 मते मिळाली, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्रावर झालेले मतदान आणि मतमोजणीत ईव्हीएम मशीनद्वारे दाखविण्यात आलेले मतदान, यामध्ये तफावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.फेरमतमोजणीची मागणी फेटाळल्याचा आरोप!मतमोजणी प्रक्रियेत गोंधळाच्या पृष्ठभूमीवर उमेदवारांकडून फेरमतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे करण्यात आली; मात्र फेरमतमोजणीची मागणी फेटाळण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.