शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमोयकोसिसवरील खर्च आठ लाख; शासनाची मदत केवळ दीड लाखाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:17 IST

अकाेला : कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अकाेल्यात सध्या ...

अकाेला : कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अकाेल्यात सध्या या आजाराच्या २३ रुग्णांची नाेंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे. एकीकडे या आजाराचे संकट असतानाच खर्चाचे नवीन संकट उभे ठाकले आहे. शासनाने महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत या आजाराला समाविष्ट केले असून १ लाख ५० हजार, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपये निश्चित केले आहेत. परंतु या आजारात विविध विषयांतील विशेषज्ञ, औषधोपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयातील वास्तव्याचा खर्चच किमान ८ लाखांवर जात असल्याने शासनाची ही मदत तोकडी पडत आहे. यामुळे जनआरोग्य योजनेत असलेल्या खासगी रुग्णालयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांवर पडू नये यासाठी योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांना महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाखांचे दहा दिवसांचे ‘पॅकेज’ दिले आहे. परंतु बहुआयामी विशेषज्ञांच्या सेवांची पडत असलेली गरज, शस्त्रक्रिया, महागडी औषधी व रुग्णालयातील वास्तव्य आदींचा खर्चच एका रुग्णाला ८ ते १० लाख रुपये येत असताना दीड लाखात हा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न खासगी रुग्णालयांना पडला आहे. सध्या जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या ३८ खासगी रुग्णालयातून एकाही रुग्णालयात या योजनेतून उपचार सुरू नसल्याची माहिती आहे. यामुळे रुग्णांचा संपूर्ण भार मेयो, मेडिकलवर आला आहे.

बाॅक्स...

याेजनेतून खर्चच नाही

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मायक्रोबायलॉजिस्ट, इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट, ऑप्थेल्मोलॉजिस्ट, डेंटिस्ट, मॅक्सिलोफेशिअल किंवा प्लॅस्टिक सर्जन व बायोकेमिस्ट अशा विशेषज्ञांच्या सेवांची गरज पडते. यांच्याशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाय, ‘लिपोसोमल अ‍ॅम्फोटीसिरीन-बी’ ‘५० एमजी’च्या एका इंजेक्शनची किंमत बाजारात ७,५०० रुपयांचे आहे. आजाराची गंभीरता पाहून दिवसाला जवळपास दोन ते चार इंजेक्शन दिले जातात. ‘पॉसॅकोनाझोल’ दहा गोळ्यांची किंमत पाच हजारांच्या घरात आहे. या शिवाय, इतरही औषधांचा खर्च आहेच. हा खर्च दीड लाखात बसत नसल्याचे योजनेतील काही रुग्णालयांचे म्हणणे आहे. सध्यातरी एकाही खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार होत नाही.

.....................

काेराेनामध्ये रेमडेसिविरच्या इंजेक्शनसाठी धावाधाव करावी लागली व आता म्युकरमायकोसिसच्या औषधांसाठी शाेधाशाेध करावी लागते. औषधेही खर्चिक आहेत. आराेग्य याेजनेचा लाभ नाही घेतला.

अनिल खांडके

म्युकरमायकोसिसवरील रोजचा खर्चच जास्त आहे . रेमडेसीवीरसारखे या आजाराचेही इंजेक्शन रुग्णालयातून मिळाले तर रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक थांबेल.

संताेष मुऱ्हेकर

..............................................