शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित विकास कामांमध्ये भ्रष्टाचार; तपासणी करून ‘एनओसी’द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

काेराेना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे शुक्रवारी महापालिकेत ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्वसाधारण सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी संपूर्ण सभेच्या कामकाजादरम्यान विराेधी पक्ष ...

काेराेना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे शुक्रवारी महापालिकेत ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्वसाधारण सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी संपूर्ण सभेच्या कामकाजादरम्यान विराेधी पक्ष काॅंग्रेस व शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याला विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी तिव्र विराेध नाेंदविला. दरम्यान, स्थानिक लाेकप्रतिनिधींनी शहरात सुचविलेल्या विकास कामांना महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय पटलावर आला असता साजीद खान यांनी कडाडून विराेध केला. स्थानिक लाेकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विकास कामांना मंजूरी देण्याआधी त्यांची तपासणी करा. यातील अनेक कामे अनेकदा प्रस्तावित करून त्याबदल्यात लाखाे रुपयांची देयके लाटली जात असल्याचा संशय व्यक्त करीत साजीद खान यांनी यामध्ये माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दडला असल्याचा आराेप केला. त्यावर आयुक्त् निमा अराेरा यांनी साजीद खान यांना लेखी तक्रार केल्यास प्रस्तावांची छाननी करणे साेयीस्कर हाेणार असल्याचे सांगितले. त्यावर विकास कामांना सभागृहाने मंजूरी देण्यापूर्वी रस्त्यांची तपासणी करा, अन्यथा सर्वांना कायदेशिर अडचण निर्माण हाेइल,असा गर्भित इशारा यावेळी साजीद खान यांनी दिला. यावर विराेधी पक्षातील नगरसेवकांनी आक्षेप घेतला असता निर्माण झालेल्या गदाराेळात महापाैर अर्चना मसने यांनी विषयाला मंजूरी दिली.

मनपाच्या विलंबामुळे विकास कामे प्रभावित

लाेकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांना मनपाने तातडीने ‘एनओसी’द्यावी, असे मत माजी महापाैर विजय अग्रवाल यांनी व्यक्त केले. मनपाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यास विलंब हाेत असल्याने या विषयाला तातडीने मंजूरी देण्याची सूचना विजय अग्रवाल यांनी मांडली.

लघु व्यावसायिकांच्या साहित्याची ताेडफाेड नकाे!

काेराेनामुळे सर्व उद्याेग,व्यवसाय अडचणीत आल्याची परिस्थिती असताना सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांच्या साहित्याची ताेडफाेड करणे, साहित्य जप्त करून त्याचा लिलाव करणे आदी बाबी याेग्य नसल्याचे मत साजीद खान पठाण यांनी व्यक्त केले. त्यावर जप्त साहित्याचा लिलाव हाेउन अतिक्रमण हटविण्याची कारवाइ हाेणारच असे आयुक्त निमा अराेरा यांनी ठणकावून सांगितले.