शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत मनपाची गाडी रुळावर आणणार - निमा अराेरा यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 09:59 IST

Nima Arora News मनपाची प्रशासकीय गाडी रुळावर आणणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.

अकाेला : शहरवासीयांना मूलभूत सुविधांची पूर्तता करणे महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावण्यासह मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देणार असून पुढील सहा महिन्यांत मनपाची प्रशासकीय गाडी रुळावर आणणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली. निमा अराेरा यांनी साेमवारी मनपाचे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.

महापालिकेच्या आयुक्तपदी शासनाने ‘आयएएस’ निमा अराेरा यांच्या नियुक्तीचे आदेश ३ फेब्रुवारी राेजी जारी केले हाेते. अराेरा यांनी साेमवारी मनपात दाखल हाेत आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, या वेळी त्यांनी शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. मनपा कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे याकरिता उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा यांनी व्यक्त केला.

विभाग प्रमुखांसाेबत साधला संवाद

मनपात दुपारी कामकाज स्वीकारणाऱ्या निमा अराेरा यांनी सायंकाळी ४ वाजता सर्व विभाग प्रमुखांसाेबत संवाद साधला. या वेळी विभाग प्रमुखांनी साेबत आणलेल्या नाेंदवह्या, रजिस्टर आदी साहित्य दालनाबाहेर ठेवण्याचे निर्देश दिले हाेते.

स्वच्छतेसाठी फाैजफाटा तरीही...

शहरातील साफसफाईच्या कामासाठी मनपाकडे माेठा फाैजफाटा आहे. आस्थापनेवर ७४२ सफाई कर्मचारी असून पडीक प्रभागासाठी ५२२ खासगी सफाई कर्मचारी आहेत. तरीही आज राेजी शहराच्या कानाकाेपऱ्यात घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या, गटारे दिसत असून सांडपाण्याची समस्या जैसे थे असल्याने सर्वसामान्य अकाेलेकरांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.

१३६ काेटींचा कर कसा वसूल करणार?

मनपाच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे अकाेलेकरांकडे तब्बल १३६ काेटी रुपये थकीत आहेत. मालमत्ता करवाढीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ३१ मार्चपर्यंत ही रक्कम वसूल न केल्यास नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार पुढील आर्थिक वर्षात सुधारित दरानुसार टॅक्सच्या रकमेची वसुली करावी लागणार आहे. यातून नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रसिद्धी नकाे, कामाला प्राधान्य!

सर्वसामान्य नागरिकांची कामे निकाली काढणे व प्रशासकीय कामकाजात गती आणण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे आयुक्त निमा अराेरा यांनी स्पष्ट केले. अशी कामे करताना प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणे याेग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला