शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : ४५ वर्षांवरील नागरिकांना घ्यावी लागेल ऑनलाईन अपाॅइंटमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 10:33 IST

Corona Vaccination in Akola : दुसऱ्या डाेससाठी ज्येष्ठांना सकाळी सहा वाजता ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.

अकोला : शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डाेससाठी आता लसीकरण केंद्राच्या ठिकाणी टाेकन दिल्या जाणार नाही. लसीकरण केंद्रांत हाेणारी गर्दी व काेराेनाचा संसर्ग पाहता दुसऱ्या डाेससाठी ज्येष्ठांना सकाळी सहा वाजता ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. ज्या दिवशी लस उपलब्ध असेल, त्याच दिवशी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याचे निर्देश आराेग्य यंत्रणेकडून प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाने मार्च महिन्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. लसीचा तुटवडा असताना केंद्र शासनाने १ पासून १८ ते ४४ या वयाेगटातील नागरिकांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटद्वारे लसीकरणाला प्रारंभ केला. यामुळे लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी प्रचंड गाेंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शासनाने १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करून ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डाेसला प्राधान्य दिले. दुसऱ्या डाेससाठी लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी हाेणारी गर्दी पाहता आता ज्येष्ठांना सुद्धा ऑनलाईन अपॉइंटमेंटद्वारे नाेंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

 

दुसऱ्या डाेससाठी अत्यल्प लस उपलब्ध

४५ वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डाेस घेण्याचा कालावधी संपुष्टात आला आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाने पर्याप्त प्रमाणात लस उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मनपाच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेला दुसऱ्या डोससाठी को-व्‍हॅक्‍सिनचे १५०० आणि कोव्‍हिशिल्‍डचे केवळ एक हजार डाेस प्राप्‍त झाले आहेत.

 

२१ व २२ मे राेजी काेव्हॅक्सिन

येत्या २१ व २२ मे राेजी काेव्हॅक्सिनचा दुसरा डाेस कस्‍तुरबा गांधी रुग्‍णालय, भरतीया रुग्‍णालय, कृषी नगर मनपा शाळा क्रं. २२, आदर्श काॅलनी मनपा शाळा क्रं. १६ तसेच अकाेटफैलस्थित अशाेक नगर येथील नागरी आरोग्‍य केंद्रांत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध राहील.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला