खेर्डां भागाई येथे १३, कोथळी येथे १३, चोहगाव २, दोनद १, धाकली १, पुनोती ८, बार्शीटाकळी २, महागाव ३, महान १, लोहगड २, वरखेड २, , वरखेड सुकळी १, सुकळी १, एरंडा १, राजनखेड १ असे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पारडी येथील सहा बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. बार्शीटाकळी तालुक्यात मृत्यूची संख्या कमी असली तरी रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. तहसीलदार गजानन हामंद यांनी दररोज तालुक्यातील दोन ठिकाणी चाचणीची व्यवस्था केली. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी न घाबरता चाचणी करून घ्यावी. शासनाच्या नियमांचे पालन करावे. प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. सर्व रुग्णांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे, असे तहसीलदार गजानन हामंद यांनी सांगितले.
कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी ७६ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST