कुठल्या वर्षात किती पेशंट
वर्ष - डेंग्यूचे रुग्ण
२०१६ - ०४
२०१७ - १८
२०१८ - ७०
२०१९ - ६१
२०२० - ३१
डेंग्यूचा सर्व्हे
मध्यंतरी महापालिकेच्या मलेरिया विभागासह जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात डेंग्यू संदर्भात सर्व्हे करण्यात आला. या अंतर्गत प्रत्येक घरातील सदस्य संख्या, पाण्याचा वापर आणि त्यासाठी असलेल्या भांड्यांची माहिती घेण्यात आली. पाण्यासाठी वापरात असलेली भांडी, टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ धुण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय लक्षणे आढळताच डॉक्टरांना दाखविण्याचे आवाहनदेखील आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आले.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूची लागण झाल्यास रुग्णाला तीव्र ताप येतो.
तसेच शरीरावर लाल पुरळ येतात.
यासोबतच रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट कमी होतात.
रुग्णाच्या प्लेटलेट २५ हजारांपेक्षा कमी झाल्यास कानातून रक्त येण्याची शक्यता असते.